यमनमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या विमानावर बॉम्ब हल्ला, दहा जणांचा मृत्यू

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा बॉम्बस्फोट तेव्हा झाला जेव्हा एक विमान नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांना घेऊन विमानतळावर उतरले.

यमनमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या विमानावर बॉम्ब हल्ला, दहा जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 7:26 PM

यमन : यमनच्या (Yemen) एदेन विमानतळावर (Aden Airport) बुधवारी जोरदार बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटामध्ये तब्बल 10 जण ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर अने क लोक जखमी झाले आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा बॉम्बस्फोट तेव्हा झाला जेव्हा एक विमान नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांना घेऊन विमानतळावर उतरले. (yemen aden airport blasts many people died dozens injured)

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, विमानतळावर दोन स्फोटांचा आवाज ऐकू आला. तर या हल्ल्यामागे इराण समर्थीत हूथी बंडखोरांचा (Iran-supported Huthi militia) हाथ असल्याचं यमनकडून नमूद करण्यात आलं आहे. तर बॉम्बस्फोट झाल्यानंतर लगेचच गोळीबाराचा आवाजही ऐकू आला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान पंतप्रधान मोईन अब्दुलमलिक यांच्यासह नव्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना घेऊन विमानतळावर दाखल झालं. जसे मंत्री विमानातून खाली उतरण्यास सुरुवात झाली नेमका त्याचवेळी मोठा स्फोट झाला. दरम्यान, आतापर्यंत यामध्ये नेमका कोणाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मंत्र्यांचीही नावं आहेत का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

भीषण स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. सौदी टेलिव्हिजन अल हदत यांनी या दृश्याचे व्हीडिओ प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये स्फोटामुळे लोकांचा गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.

फुटीरतावाद्यांसोबत स्थापन केलं सरकार

खरंतर, यमनमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त सरकार आणि दक्षिणेतील फुटीरतावाद्यांनी एकत्र येत 18 डिसेंबरला सरकार स्थापन केलं. या दोघांनी मिळून हुती बंडखोरांविरोधात मोर्चा केला. राजधानी सनासह हूती बंडखोरांनी उत्तर भाग ताब्यात घेतला आहे. यमनचे मंत्री मोआमर अल-इरयानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारमधील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. हे भयानक कृत्य इराण समर्थीत होथी बंडखोरांनी केलं आहे. पण ते आमचं मनोबल तोडणार नाही, असा आमचा विश्वास आहे असंही ते म्हणाले. (yemen aden airport blasts many people died dozens injured)

संबंधित बातम्या –

विनामास्क प्रचार महागात, शपथेपूर्वीच नवनियुक्त खासदाराचा कोरोनाने मृत्यू

‘हा’ देश सदैव भारताच्या पाठिशी, पाकिस्तान, चीनचे धाबे दणाणले

(yemen aden airport blasts many people died dozens injured)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.