येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक : येवल्यात बलात्कारातील (Yewala Corona Latest Update) संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न नागरिक, पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेला येवला कोरोनामुक्त झाल्याचं चित्र असतानाच येवल्यात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 3 पोलिसांना क्वारंटाईन (Yewala Corona Latest Update) करण्यात आलं आहे.
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,608 रुग्णांची भर, तर 60 जणांचा कोरोनाने मृत्यूhttps://t.co/uTDD2118Nv@rajeshtope11 @CMOMaharashtra @mybmc #CoronaUpdatesInIndia #CoronaPandemic #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2020
