योगी आदित्यनाथ सर्व मुख्यमंत्र्यांवर भारी, गुगलची आकडेवारी!

योगी आदित्यनाथ सर्व मुख्यमंत्र्यांवर भारी, गुगलची आकडेवारी!

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्रचारासाठी त्यांना नेहमीच मागणी असते. वयाने मोठे असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह हे सुद्धा योगी आदित्यनाथ यांचे आशिर्वाद घेताना सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. त्यावरुन योगींची क्रेझ दिसून येते. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांना जाणून घेणं आणि त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणं यामध्ये […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्रचारासाठी त्यांना नेहमीच मागणी असते. वयाने मोठे असलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह हे सुद्धा योगी आदित्यनाथ यांचे आशिर्वाद घेताना सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. त्यावरुन योगींची क्रेझ दिसून येते. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांना जाणून घेणं आणि त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणं यामध्ये अनेकांना रुची आहे.

गुगल सर्च ट्रेंड डेटानुसार, गेल्या वर्षभरात योगी आदित्यनाथ हे सर्वाधिक सर्च केलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपचा दुसरा कोणताही मुख्यमंत्री त्यांच्या जवळपासही नाही.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी असो किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असो कोणीही योगी आदित्यनाथ यांच्या आसपास नाही.

योगी हे केवळ भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्याच पुढे आहेत असं नाही, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्याही पुढे आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांनाही योगी आदित्यनाथ यांनी मागे टाकलं आहे.

यंदा गुगल सर्च इंजिनवर योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचं गुगलने आपल्या वेबसाईटवर आकड्यांसह जाहीर केलं आहे.

दरम्यान, गुगलने भलेही इंटरनेट जगतातील आकडेवारी जाहीर केली असली, तरी योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेचा कस, 2019 मधील लोकसभा निवडणुकीत लागणार आहे. यूपीतील 73 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें