AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहित, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

ऑनलाईन लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर खोटी माहिती टाकून एका तरुणाने एका मुलीला फसवल्याची माहिती समोर आली आहे (Youth cheated girl on online marriage website).

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहित, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड
| Updated on: Nov 29, 2020 | 8:50 PM
Share

ठाणे : लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवर एकमेकांना पसंत केले. लग्न ठरले. मात्र लग्नाच्या तीन दिवसाआधी तिला माहिती पडले की, त्याचे लग्न आधीच झाले आहे. दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर जे काम पोलिसांनी करायला हवे होते. ते तिने केले. अखेर तिला फसविणारा तरुण विजय रामचंद्र जगदाळे याला विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. अशा व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरुन अन्य कोणत्या मुलीची फसवणूक होता कामा नये, अशी मागणी पिडीत तरुणीने केली आहे (Youth cheated girl on online marriage website).

डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरुणीने लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईटवर लग्नाकरीता माहिती टाकली होती. काही दिवसात तिला रिप्लाय आला. नवी मुंबईत राहणाऱ्या विजय जगदाळे याने रिप्लाय दिला. दोघांच्या घराच्यांनी बोलणी केली. त्यानंतर त्यांचा साखरपूडा झाला. 26 मे 2019 रोजी लग्न ठरले.

लग्नाच्या तीन दिवसाआधीच तरुणीला माहित पडले की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला. तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी तरुणाचं पहिलं लग्न झाल्याचा पुरावा मागितला. मंदिरातील लग्नाचा पुरावा आमच्यासाठी ग्राह्य नसल्याचं पोलीस निरिक्षक सांगितलं, अशी माहिती पिडीत तरुणीने दिली.

पहिल्या पत्नीसोबत विजयची घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली आहे. हा पुरावा घेऊन तरुणीने पोलीस ठाणे गाठले. हा पुरावा देखील पोलिसांनी ग्राह्य धराला नाही. अखेर पिडीत तरुणीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. एसीपी जे डी मोरे यांच्या आदेशानंतर अखेर या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी तक्रार घेतली. आरोपी विजय जगदाळे आणि त्याच्या वाडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीतेच्या दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतर विजय जगदाळे याला अटक करण्यात आली.

दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती विष्णूनगर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी वाय. जाधव यांनी दिली. “आरोपीने मलाच नाही फसवले तर माझ्यासोबत इतर महिलांची देखील फसवणूक केली आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरुन अन्य कोणत्या मुलीची फसवणूक होता कामा नये”, अशी मागणी पिडीतेने केली आहे (Youth cheated girl on online marriage website).

हेही वाचा :

घरात झोपलेली असताना 90 वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग, नराधमाला अटक

कल्याणजवळ थरार, विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, तरुणीचा जिगरबाज लढा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.