AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारुमुळे एकही मृत्यू नाही : पोलीस विभाग

गडचिरोली : ‘दारूबंदीमुळे गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे दारूबंदी उठवून शुध्द दारू पुरवावी’ अशी मागणी करणारे काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. मात्र, सरकारी आकडेवारीवरुन त्यांचा दावा फोल ठरवत चांगलीच चपराक लगावली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनाकडे […]

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारुमुळे एकही मृत्यू नाही : पोलीस विभाग
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 03, 2020 | 1:40 AM
Share

गडचिरोली :दारूबंदीमुळे गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे दारूबंदी उठवून शुध्द दारू पुरवावी’ अशी मागणी करणारे काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. मात्र, सरकारी आकडेवारीवरुन त्यांचा दावा फोल ठरवत चांगलीच चपराक लगावली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनाकडे जिल्ह्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी मागितली. त्यावर उत्तर देताना पोलीस प्रशासनाने एकही मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट केलं (Zero death due to Poisonous Alcohol Gadchiroli Police Department inform Dr Abhay Bang).

डॉ. अभय बंग यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे विषारी दारूमुळे किती मृत्यू झाले याची माहिती मागितली होती. यावर पोलीस प्रशासनाने लिखित उत्तर देत गेल्या पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यात विषारी दारुमुळे एकही मृत्यूची घटना घडलेली नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि धर्मरावबाबा आत्रम हे दारुबंदी हटवण्यासाठी चुकीचा दावा करून दारूबंदीबाबत अपप्रचार करत आहेत, अशी भूमिका जिल्हा दारुबंदी समितीने मांडली आहे.

“जिल्ह्यात विषारी दारुमुळे मृत्यू झालेले नाहीत. खरेच जर तसे मृत्यू झाले असते, तर लोक-प्रतिनिधी आणि मंत्री म्हणून त्यांनाच ते लांछनस्पद ठरेल. दारूबंदी हा शासकीय कायदा असून त्याची योग्य अंमलबजावणी ही शासनाची आणि नेत्यांची जबाबदारी आहे,” असं मत समितीने व्यक्त केलं आहे.

जिल्हा दारूबंदी समितीने म्हटलं आहे, “वस्तुत: शासन पुरस्कृत ‘शुध्द’ दारु देखील आरोग्याला आणि समाजाला घातकच आहे. दारूवर शासनाने कर घेतल्यामुळे ती लोकांच्या हिताची होत नाही. वैध आणि अवैध दोन्ही प्रकारची दारू ही घातकच आहे. म्हणून दारूबंदी हवी. ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिध्द वैद्यकीय नियतकालिकाने निर्णय जाहीर केला आहे की शून्य दारू हीच सुरक्षित पातळी आहे. म्हणून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कायम हवी. दारूबंदी केल्याने दारूचा पुरवठा व वापर जवळपास निम्मा होतो. पुढे अजून कमी करायला जिल्हा दारुमुक्तीचे प्रयत्न हवेत.”

संबंधित बातम्या :

BLOG: लोकलढा दारूमुक्तीचा : ‘दारू’कारण

सरकारला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचा सवाल

‘गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवा’, राज्यातील 40 कलावंत, विचारवंतांचे मुख्यमंत्री आणि पवारांना आवाहन

संबंधित व्हिडीओ :

Zero death due to Poisonous Alcohol Gadchiroli Police Department inform Dr Abhay Bang

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...