AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP Elections : मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? वाचा संपूर्ण माहिती

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

ZP Elections : मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? वाचा संपूर्ण माहिती
मतदान ओळखपत्र, संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर उद्या मतमोजणी असणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Is it possible to vote without a voter id? Know here)

अशावेळी मतदारांच्या मनात काही प्रश्न आहेत. मतदानासाठी कोणते ओळखपत्र महत्वाचे आहे? आणि मतदान ओळखपत्र नसेल तर मतदान करता येतं का? यासंबंधी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जाणून घेऊयात यासंबंधी महत्त्वाची माहिती….

मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल.

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.

मतदानासाठी कोणते ओळखपत्र चालणार?

मतदान ओळखपत्राऐवजी तुम्ही इतर सरकारी ओळखपत्र म्हणजे पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यक्रमपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्र तुम्ही मतदान करता वेळेस घेऊन जाऊ शकतात.

मतदान केंद्रावर येण्यापूर्वी तुमचे नाव मतदान यादीत आहे का हे पाहावे लागेल. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे अशाच मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश मिळेल.

मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?

– पासपोर्ट

– वाहन चालक परवाना

– छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम

– सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)

– छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक

– पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड

– मनरेगा कार्यक्रमपत्रिका

– कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

– छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज

– खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र

– आधारकार्ड

इतर बातम्या :

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, फडणवीस आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

भावना गवळींची ईडी चौकशीला दांडी, हजर राहण्यासाठी मागितला 15 दिवसांचा वेळ!

Is it possible to vote without a voter id? Know here

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.