AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॉकलेटप्रेमींना माहितचं नसेल चॉकलेटबाबतच्या ‘या’ 10 रंजक गोष्टी

लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण चॉकलेट अगदी चवीने खातात. पण चॉकलेटबाबत अशी काही रंजक तथ्ये आहेत ते अद्याप काही लोकांना माहितच नाहीये, यासाठी आजच्या लेखात आपण याच तथ्यांबद्दल जाणून घेऊयात.

चॉकलेटप्रेमींना माहितचं नसेल चॉकलेटबाबतच्या 'या' 10 रंजक गोष्टी
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 01, 2025 | 6:30 PM
Share

चॉकलेट ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. चॉकलेटचे अनेक प्रकार आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. जसे की क्रिमी टेक्सचर, कुरकुरीत टच आणि नट्ससह चॉकलेट. तर आपल्यापैकी अनेकांना मिल्क चॉकलेट खायला आवडते तर काहींना डार्क चॉकलेट खायला आवडते. त्याचबरोबर आजकाल कस्टमाइज्ड चॉकलेट देखील उपलब्ध आहेत जे फुलांपासून ते अनेक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील चॉकलेट प्रेमी असाल तर तुम्हाला चॉकलेट संबंधित काही तथ्ये माहित असणे आवश्यक आहे जे खूप मनोरंजक आहेत.

चॉकलेटचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे जे फिटनेस प्रेमी आहेत ती लोकं डार्क चॉकलेटला पहिले प्राधान्य देतात. बहुतेक लोकं चॉकलेटचे ब्रँड आणि प्रकारांशी परिचित असतात, परंतु त्याच्या उत्पत्तीबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत जी फार कमी लोकांना माहिती आहेत. तर आजच्या लेखात आपण चॉकलेटबाबतच्या 10 रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

चॉकलेट बद्दल मनोरंजक तथ्ये

1. आपल्या देशात चॉकलेट प्रेमींची कमतरता नाही, पण तुम्हाला माहिती आहे का की ब्रिटीश राजवटीत चॉकलेट भारतात आले. पहिल्यांदाच तमिळनाडूच्या कोर्टलममध्ये कोकोची लागवड सुरू झाली.

2. चॉकलेट हे कोको बीन्सपासून बनवले जाते, त्याचे तीन प्रकार आहेत, क्रिओलो, फोरास्टेरो, ट्रिनिटारियो.

3. स्वित्झर्लंड हा असा देश आहे जे सर्वात जास्त चॉकलेटचा वापर करतो. त्यानंतर जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि बेल्जियम सारखे देश देखील मोठ्या प्रमाणात चॉकलेट वापर करतात.

4. शुगरफ्री चॉकलेट खाणे फायदेशीर असते आणि त्याच बरोबर या चॉकलेटचा सुगंध तणाव कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास देखील मदत करू शकतो

5. चॉकलेटचा उगम प्राचीन मेसोअमेरिकन संस्कृतींशी संबंधित असल्याचे मानले जाते.

6. आजच्या काळात चॉकलेट अनेक फ्लेवर्समध्ये बनवले जातात, परंतु पहिल्यांदा जेव्हा चॉकलेटचा शोध लागला तेव्हा ते पेय म्हणून वापरले गेले.

7. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैनिकांच्या ऊर्जा मिळावी यासाठी त्यांचा आहारात किंवा रेशनमध्ये चॉकलेटचा समावेश केला गेला होता. कारण चॉकलेट हे शरीरात ऊर्जा निर्माण करते.

8. मिल्क चॉकलेट हा देखील लोकप्रिय पर्याय आहे. त्याचे उत्पादन 1875 मध्ये कोएनराड जोहान्स व्हॅन हौटेन यांनी सुरू केले होते.

9. ब्रिटनमधील पहिला चॉकलेट कारखाना 1847 मध्ये जे.एस. फ्राय अँड सन्सने उघडला होता, परंतु चॉकलेटची विक्री 1842 मध्ये सुरू झाली होती.

10. चॉकलेटच्या शोधाबद्दल काही मनोरंजक तथ्ये आहेत. त्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते आणि प्राचीन संस्कृतींना ते वेगवेगळ्या प्रकारे माहित होते. जसे की अझ्टेक लोकं चलन म्हणून कोको बीन्स वापरत असत, मायन लोकं ते कोको बीन्सला देवांचे अन्न म्हणत असत आणि ओल्मेक्स लोकं कोको बीन्सपासून पेय बनवत असत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.