AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही पचनक्रियेच्या समस्येने त्रस्त आहात का? ‘हे’ 5 स्ट्रीट फूड्स खाऊन पहा

स्ट्रीट फूड म्हणजे फक्त मसालेदार आणि आरोग्याला हानिकारक पदार्थ, असा आपला समज असतो. पण काही देसी स्ट्रीट फूड चवीसोबतच पचनासाठीही उत्तम असतात. चला, असे 5 पदार्थ आणि ते खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया.

तुम्हीही पचनक्रियेच्या समस्येने त्रस्त आहात का? 'हे' 5 स्ट्रीट फूड्स खाऊन पहा
खाद्यभ्रमंती
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Aug 05, 2025 | 4:10 PM
Share

भारतात स्ट्रीट फूडची आवड कोणाला नसते? पण ‘स्ट्रीट फूड’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मसालेदार आणि आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ येतात. अनेक लोकांना वाटतं की स्ट्रीट फूड फक्त चवीसाठी असतं, ते आरोग्याला नुकसान पोहोचवतं, खासकरून पचनाच्या समस्या निर्माण करतं. पण तुम्हाला माहीत आहे का, काही देसी स्ट्रीट फूड असेही आहेत जे चविष्ट तर आहेतच, पण तुमच्या पोटासाठीही फायदेशीर आहेत!

चला, अशा 5 देसी स्ट्रीट फूड्सबद्दल जाणून घेऊया

पाणीपुरी : पाणीपुरीचा तिखट-गोड पाणी जिरे, पुदीना, हिंग आणि चिंच यांसारख्या पदार्थांपासून बनतो. हे सर्व घटक गॅस कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे, पाणीपुरी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ती फायदेशीर ठरू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी स्वच्छ आणि चांगल्या ठिकाणीच पाणीपुरी खा.

ढोकळा : ढोकळा ही एक गुजराती डिश आहे, जी बेसनपासून बनवली जाते आणि वाफेवर शिजवली जाते. यात प्रोबायोटिक (Probiotics) असतात, जे पचनासाठी खूप चांगले असतात. ढोकळा कमी फॅटचा आणि सहज पचणारा पदार्थ असल्यामुळे तो एक चांगला आणि आरोग्यदायी नाश्ता ठरतो.

मूग डाळ चाट : अंकुरित मूग किंवा भाजलेल्या मूग डाळीपासून बनवलेली ही चाट फायबर (Fiber), प्रोटीन (Protein) आणि ताज्या भाज्यांनी भरलेली असते. ही चाट पचायला हलकी आणि स्वादिष्ट असते. फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करायलाही मदत होते.

भाजलेले कणीस (भुट्टा) : कोळशावर भाजलेले कणीस लिंबू आणि चाट मसाल्यासोबत खाणं हा एक वेगळाच आनंद असतो. यातही भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून (Constipation) आराम मिळतो. महत्त्वाचं म्हणजे, हा पदार्थ तेलाशिवाय बनतो, त्यामुळे तो आणखी आरोग्यदायी आहे.

मिसळ पाव : मिसळ पावामध्ये अंकुरित बीन्स असतात, जे फायबर आणि प्रीबायोटिकने (Prebiotics) भरपूर असतात. हे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाला (Bacteria) वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. मिसळ पाव खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.

हे खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

1. नेहमी स्वच्छ स्टॉलवरूनच खा.

2. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा.

3. कोणतीही गोष्ट संतुलित प्रमाणातच खा.

हे देसी स्ट्रीट फूड्स फक्त चवच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहेत. त्यामुळे, पुढच्या वेळी स्ट्रीट फूड खाताना फक्त चवीचाच नाही, तर आरोग्याचाही विचार करा!

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट