नारळाच्या तेलाचे ‘हे’ आहेत 5 आश्चर्यकारक घरगुती उपयोग, जाणून घ्या
नारळाचे तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप पुर्वीपासून वापरले जात आहे आणि बरेच लोकं या तेलाचा वापर जेवण बनवताना देखील करतात. कारण नारळाचे तेल हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे.

नारळ हे अस एक घटक आहे ज्याचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. नारळाचे पाणी पिण्यापासून ते त्याची मलाई खाण्यापर्यंत शरीराला अनेक फायदे मिळतात, तर नारळाचे दूध हे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. नारळाची मलाई ही डेजर्ट्स मध्ये देखील वापरली जाते, लोकं नारळाचा वापर थेट खाण्यापासून ते पदार्थांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. नारळापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये नारळाचे तेल असणे सर्वात सामान्य आहे, कारण बरेचजण त्यांच्या दिनचर्येत सहजपणे नारळाचे तेल समाविष्ट करू शकतात. केसांना मसाज करण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी नारळाचे तेल वापरले असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे तेल घरातील इतर अनेक कारणांसाठी देखील वापरले जाऊ शकते?
नारळाच्या तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, त्यामुळे त्वचेला पोषण देण्यासोबतच ते संसर्गापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते, त्यामुळे पुरळ, मुरुम, खाज इत्यादी त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी नारळाचे तेल प्रभावी आहे. सध्या, तुम्ही ते इतर कोणत्या प्रकारे वापरू शकता ते जाणून घेऊया.
दातांसाठी नारळ तेल फायदेशीर
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि दात उजळ करण्यासाठी तुम्ही नारळ तेलाचा वापर देखील करू शकता. जर तुम्हाला तोंडाची दुर्गंधीची समस्या असेल तर एक चमचा नारळ तेल घ्या आणि ते तोंडात थोडा वेळ फिरवा आणि नंतर तोंड स्वच्छ धुवा. या प्रक्रियेला ऑइल पुलिंग म्हणतात जे तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय, नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिक्स करा आणि दररोज दात घासा, यामुळे तुमचे दात स्वच्छ होतीलच पण हिरड्याही निरोगी राहतील.
फर्निचर पॉलिश करते
नारळाचे तेल फार जड नसते, म्हणून तुम्ही लाकडी फर्निचर चमकवण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकता. कटिंग बोर्डवर नारळाच्या तेलाने कंडिशनिंग देखील करता येते. यामुळे फर्निचर आणि लाकडी फ्रेम तसेच बोर्ड इत्यादींना नवीन चमक येते.
च्युइंगम काढण्यासाठी
बऱ्याचदा च्युइंगम चुकून केसांना किंवा कपड्यांना चिकटतो. ते काढण्यासाठी नारळाचे तेल वापरा कारण ते हलके असते आणि त्यावर कोणताही डाग पडत नाही. नारळाचे तेल लावल्यानंतर, च्युइंगम सहजपणे निघून जाईल.
दरवाजे आणि खिडक्यांमध्ये नारळ तेलाचा वापर
दरवाजे आणि खिडक्यांमधून येणारा आवाज खूपच क्रकश असतो. कधीकधी ते इतके दरवाजे आणि खिडक्या इतके घट्ट बसतात की उघडणे कठीण होते. तर ही समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या कडा आणि कुलूपांवर नारळाच्या तेलाचे 6-7 थेंब टाका. यामुळे दरवाजे आणि खिडक्या उघडणे खूप सोपे होते.
कापल्यावर आणि भाजलेल्यावर जखमेसाठी फायदेशीर
नारळाचे तेल सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाते, याशिवाय, किरकोळ भाजलेल्या किंवा कापलेल्या जागी देखील नारळाचे तेल लावता येते. ते संसर्ग रोखते आणि त्वचा बरी देखील करते. भाजलेल्या जागी नारळाचे तेल लावल्याने आराम मिळतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
