AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपल्स-मुरूमांच्या समस्या दूर करण्यसाठी ‘ही’ हेल्दी अन् टेस्टी ड्रिंक ठरेल फायदेशीर

Drink for Healthy Skin: बीट आणि चिया सिड्सपासून बनवलेले ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या ज्यूसचे सेवन केल्यामुळे तुमचे हृदय, मेंदू, त्वचा आणि पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला निरोगी आणि उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात बीट ज्यूसमध्ये चिया सिड्स मिसळून प्या. चला तर जाणून घेऊया काय आहेत बीट ज्यूसचे चिया सिड्स सोबत खाण्याचे फायदे.

पिंपल्स-मुरूमांच्या समस्या दूर करण्यसाठी 'ही' हेल्दी अन् टेस्टी ड्रिंक ठरेल फायदेशीर
chia seeds and beetroot drinkImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 17, 2025 | 1:57 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. बदलत्या ऋतूमध्ये तुम्हाला संसर्गाचा आजार होण्याचा धोका असतो. संसर्गाचा आजार टाळण्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याची गरज असते. बीट आणि चिया सिड्स तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. बीट आणि चिया सिड्स तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. या पदार्थांचे सेवन केल्यामुले तुमचं वजन नियंत्रित राहाते आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु इतकेच नाही तर चिया सिड्स तुमच्या शरीराला हायड्रेटेड राहाण्यास मदत होते. चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 9 (फोलेट), व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम यांच्या सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाते.

बीट तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. त्यासोबतच, चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीर आणि मन निरोगी राहाते. दररोज सकाळी बीटरूट आणि चिया बियाण्यांपासून बनवलेले पाणी पिण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. बीट तुमच्या आरोग्याला अनेक पोषक तत्वं देतात. सकाळी बीटच्या ज्यूसमध्ये चिया सिड्स मिक्स करून प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात चला जाणून घेऊया.

बीटमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि मॅंगनीज असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा वाढते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यस मदत होईल. बीटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि आहारातील नायट्रेट्स शरीरात रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करतात. बीटचे सेवन केल्यामुळे तुमच्या शीरातील उच्च रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. त्यासोबतच व्यायाम केल्यानंतर जर तुम्ही बीट ज्यूसचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निधून जाण्यास मदत होते. बीट ज्यूस तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या तुमची त्वचा चमकदार बनवण्यास मदत होते. बिटच्या ज्यूसमध्ये चिया सिड्स मिक्स कूण खाल्ल्यामुळे तुमच्या बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. . बीटरूटमध्ये असलेले प्रीबायोटिक फायबर चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते, ज्यामुळे पोट निरोगी राहते. बीटरूटमध्ये असलेले नायट्रेट्स रक्त प्रवाह सुधारतात, रक्तदाब कमी करते आणि चिया सिड्समधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल दूर करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. बीटमधील नायट्रेट्स मेंदूला ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतात, त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे मेंदूच्या पेशींना बळकटी देतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात.

बीटमुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो, ज्यामुळे स्टॅमिना वाढतो आणि थकवा कमी होतो. चिया सिड्समध्ये प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामधील उर्जा दीर्घकाळ उर्जा प्रदान करण्यास मदत होते. चिया सिड्समध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची सवय नियंत्रित करता येते. बीटमुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि यकृताला डिटॉक्सिफाय करून वजन कमी करण्यास मदत करते. बीटमध्ये असलेले बेटेन आणि अँटीऑक्सिडंट्स यकृत स्वच्छ करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. बीटमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सूर्य आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करतात. चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि अधिक चमकदार बनवतात.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.