AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : पुरूषांपेक्षा बायका अधिक का जगतात ? रिसर्चमधून झाला खुलासा

स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात हे तुम्हाला माहीत आहे का ? एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे, ज्यामध्ये महिलांचे आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त काळ असते असा दावा करण्यात आला आहे.

Health Care Tips : पुरूषांपेक्षा बायका अधिक का जगतात ? रिसर्चमधून झाला खुलासा
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 03, 2023 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली : जगात बहुतांश ठिकाणी पितृसत्ताक पद्धती आहे. महिला या पुरुषांपेक्षा कमजोर असतात असेही म्हटले जाते. अनेक शारीरिक बाबींमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा किंचित कमकुवत असतात. पुरुषांचे स्नायू (muscles) मजबूत असतात आणि ते स्त्रियांपेक्षा वेगाने धावू शकतात. एवढेच नाही तर पुरुषांमध्ये जास्त वजन (can lift more weight) उचलण्याची क्षमता असते. पण स्त्रिया पुरुषांपेक्षा (woman live longer than men) जास्त काळ जगतात हे तुम्हाला माहीत आहे का ? एका नवीन संशोधनात हे समोर आले आहे, ज्यामध्ये महिलांचे आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त काळ असते असा दावा करण्यात आला आहे.

हा अभ्यास हार्वर्ड मेडिकलने प्रसिद्ध केला आहे आणि त्यानुसार हे नैसर्गिक प्रदेशांमुळे घडते. हे बर्‍याच प्रमाणात सिद्ध करणाऱ्या कारणांबद्दल जाणून घेऊया.

या रिसर्चनुसार : पुरूष आणि महिला या दोघआंमध्ये दोघांमध्ये 23 गुणसूत्र (क्रोमोझेम) असतात. यातील 22 जोड्या सारख्या आहेत आणि 23 वे भिन्न असते. 23व्या जोडीमध्ये, पुरुषांमध्ये X आणि yi गुणसूत्र असतात आणि महिलांमध्ये दोन्ही फक्त X क्रोमोझोम असतात. वडिलांचे Y गुणसूत्र कोणत्याही बदलाशिवाय त्याच्या मुलांना दिले जाते. Y क्रोमोसोम रोगांशी अधिक संबंधित आहे, त्यामुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मृत्यू जास्त होतो.

हार्मोन्स : अभ्यासानुसार, पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन काही काळानंतर स्नायूंवर परिणाम करतो आणि त्यामुळे हृदयाचे आजार उद्भवू लागतात. याउलट, इस्ट्रोजेन हे स्त्री संप्रेरक हृदयाच्या संरक्षणाचे कार्य करते. याच कारणामुळे स्त्रियांमध्ये हृदयाच्या समस्या कमी उद्भवताना दिसतात.

पुनरुत्पादक अवयव : स्तन, गर्भाशय आणि लघवीशी संबंधित कॅन्सर महिलांमध्ये जास्त असतो. मात्र या प्रकारचा कॅन्सर पुरुषांमध्येही जास्त असतो. प्रोस्टेटशी संबंधित समस्या पुरुषांना अधिक त्रास देतात आणि संशोधनानुसार, पुरुषांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

मेटाबॉलिज्म : चांगले कोलेस्ट्रॉल हे आपले हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. स्त्रियांमध्ये चांगले कोलेस्ट्रॉल 60.3 mg/dl असते, तर पुरुषांमध्ये ते 48.5 असते. यामुळे महिलांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या कमी आढळतात. तसे, लठ्ठपणा आणि इतर रोग हे चयापचयाची पातळी म्हणजेच मेटाबॉलिज्मचा रेट कमी करण्यासाठी कार्य करतात.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.