AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवलेल्या या गुलकंदामुळे केवळ तोंडात गोडपणाच उतरत नाही, तर आपल्या आरोग्यासही बर्‍याच प्रकारचे फायदे होतात.

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..
गुलकंद
| Updated on: Feb 27, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : गुलकंद घातलेले पान न खाल्लेला असा एखादाच व्यक्ती असू शकतो. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने कधीना कधी हे गुलकंद पान खाल्ले असेल. गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवलेल्या या गुलकंदामुळे केवळ तोंडात गोडपणाच उतरत नाही, तर आपल्या आरोग्यासही बर्‍याच प्रकारचे फायदे होतात. कदाचित आपल्याला ‘या’ गोष्टीची माहितीही नसेल, परंतु गुलकंद केवळ स्व्वाद्च डेट नाही, तर तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करतो आणि आतड्यांवरील जखमा देखील बऱ्या करतो. गुलकंद आपल्या शरीराला नेहमी हायड्रेट देखील ठेवतो. सध्या उन्हाळा जवळ येणार आहे आणि अशा परिस्थितीत हा मधुर गुलकंद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणारा आहे (Amazing health benefits of Gulkand).

गुलकंद सेवन केल्याने आपल्या चेहऱ्यावर चमक देखील येते आणि तो चेहऱ्याला सनस्ट्रोकपासून सुरक्षित ठेवतो. गर्भधारणेच्या वेळी बद्धकोष्ठता असल्यास, आपण नक्कीच गुलकंदचे सेवन केले पाहिजे. गुलाबात लॅक्‍सेटिव आणि ड्यूरेटिक हे दोन्ही गुणधर्म आढळतात, जे आपली चयापचय क्रिया तीव्र करतात. जर, आपली चयापचय क्रिया वेगवान असेल, तर ते वजन कमी करण्यास आपल्याला मदत करते. या सगळ्या व्यतिरिक्त, गुलकंद आपल्या शरीरास इतर अनेक समस्यांपासूनही दूर ठेवतो.

लवकरच उन्हाळा हंगाम येत आहे आणि अशा परिस्थितीत गुलकंद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हा आपले शरीर आतून खूप थंड ठेवतो. यासह, तो आपल्या त्वचेवरील अनेक समस्या दूर करण्यात मदत करतो. गुलकंद हा उन्हाळ्यात आरोग्याचा खजिना आहे. आपण याचा वापर दूध आणि पाण्याने घालून देखील करू शकता. त्यात व्हिटामिन सी, ई आणि बी आढळतात, जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे. आपल्याला घरच्या घरी गुलकंद बनवायचा असेल, तर आपण तो अगदी सहज पद्धतीने तयार करू शकता…( Amazing health benefits of Gulkand)

चला जाणून घेऊया घरच्या घरी गुलकंद कसा तयार करायचा…

गुलकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

– 200 ग्रॅम गुलाबच्या पाकळ्या

– 100 ग्रॅम पिठी साखर

– 1 टीस्पून बारीक वेलचीची पावडर

– 1 टीस्पून बडीशेप पावडर

कृती :

प्रथम गुलाबाच्या पाकळ्या धुवून स्वच्छ करा आणि नंतर एका काचेच्या भांड्यात झाकून ठेवा. आता या भांड्यात पिठी साखर घाला. यानंतर, त्यात वेलची पावडर आणि बडीशेप पावडर घाला आणि 10 दिवस उन्हात ठेवा. अधूनमधून हा पाक ढवळत रहा. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, आता या पाकळ्या पूर्णपणे विरघळल्या आहेत, तेव्हा समजून जा की, तुमचा घरगुती गुलकंद आता पूर्णपणे तयार आहे. आता आपण याचा सहज वापर करू शकता.

(Amazing health benefits of Gulkand)

हेही वाचा :

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.