AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॉपिंग बोर्डवर लपलेले बॅक्टेरिया बनू शकतात आजाराचे मूळ कारण! स्वच्छतेसाठी हे 5 उपाय जरूर वापरा

तुम्हाला माहिती आहे का, या चॉपिंग बोर्डवर असंख्य धोकादायक बॅक्टेरिया चिकटलेले असतात जे गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात? योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही, तर आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. म्हणूनच चला जाणून घेऊ चॉपबोर्ड स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स!

चॉपिंग बोर्डवर लपलेले बॅक्टेरिया बनू शकतात आजाराचे मूळ कारण! स्वच्छतेसाठी हे 5 उपाय जरूर वापरा
Avoid Food Poisoning Disinfect Your Chopping Board Using These Home RemediesImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 25, 2025 | 3:20 PM
Share

स्वयंपाकघरात रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये एक महत्त्वाची वस्तू म्हणजे चॉपिंग बोर्ड. आपण यावर भाजी, फळं, मांस, चिकन, मच्छी असं सगळं चिरतो. पण त्याच चॉपिंग बोर्डवर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकतं, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. फक्त पाण्याने धुवून ठेवलेला चॉपबोर्ड अनेकदा घातक बॅक्टेरिया वाढवतो, जो पुढे फूड पॉइजनिंग, उलट्या, जुलाब, आणि पोटाच्या गंभीर तक्रारी निर्माण करतो.

विशेषतः जर चॉपिंग बोर्ड लाकडी असेल, तर त्याच्या बारीक छिद्रांमध्ये मांसाचे रस किंवा भाज्यांचे तुकडे अडकून राहतात. हे अन्नाचे अंश तिथे सडू लागतात आणि बॅक्टेरिया वाढण्यास पोषक ठरतात. त्यामुळे अशा बोर्डवर पुन्हा काही चिरलं, तर तो जीवाणू थेट आपल्या पोटात जातो.

तर मग काय करायचं?

पाण्याने धुतलं म्हणजे स्वच्छ झालं असं समजणं चुकीचं आहे. त्यामुळे प्राकृतिक आणि अँटीबॅक्टेरियल उपायांचा वापर करणं खूप गरजेचं आहे.

घरच्या घरी चॉपबोर्ड स्वच्छ करायचा सोपा उपाय म्हणजे एक नींबू घ्या, तो अर्धा कापा आणि चॉपबोर्डवर चांगला चोळा. त्यावर थोडंसं मीठ पसरवून स्क्रब करा. नींबूमधील साइट्रिक अ‍ॅसिड बॅक्टेरिया मारण्यात मदत करतं, तर मीठ स्क्रबरसारखं काम करतं.

याशिवाय, 1 चमचा बेकिंग सोडा + 1 चमचा व्हिनेगर मिक्स करून चॉपबोर्डवर लावा, 10 मिनिटं ठेवा आणि मग गरम पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करा, तुमचा बोर्ड राहील बॅक्टेरिया-फ्री!

प्लास्टिक आणि बांबूच्या बोर्डसाठी काय?

जर तुम्ही प्लास्टिकचा चॉपबोर्ड वापरत असाल, तर लक्षात ठेवा चाकूने पडलेल्या रेषांमध्येही बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे प्लास्टिक बोर्डवर ब्लीच आणि पाणी समान प्रमाणात मिसळून स्प्रे करा, नंतर स्क्रब करून धुवा. गरज असेल, तर हा बोर्ड गरम पाण्यात किंवा मायक्रोवेव्हमध्ये टाका, त्यामुळे अजून खोलवरची घाणही निघेल.

बांबूच्या बोर्डबाबत मात्र काळजी घ्या त्याला पाण्यात फार वेळ भिजवू नका, नाहीतर तो फाटतो. स्वच्छ करताना पटकन धुवा आणि कोरडं पुसून घ्या.

आहारात ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’ टाळा

एकाच बोर्डवर सगळं चिरल्यामुळे वेगवेगळ्या अन्नांमधील बॅक्टेरिया एकमेकांवर पसरण्याचा धोका वाढतो. यासाठी फळं, भाज्या, मांस आणि मच्छीसाठी वेगवेगळे चॉपबोर्ड वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कधी बदलावा बोर्ड?

जेव्हा चॉपिंग बोर्डवर खोल खाचा पडतात, किंवा कितीही धुतला तरी वास जात नाही तेव्हा तो बोर्ड लगेच बदला. नियमित अंतराने बोर्ड बदलणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.

शेवटी काय लक्षात ठेवा?

आपल्या किचनमधील हायजीन जितकं स्वच्छ, तितकं आपलं आरोग्य बळकट. रोजचं जेवण योग्य आणि सुरक्षित ठेवायचं असेल, तर चॉपिंग बोर्डची योग्य स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर साध्या भाजीच्या चिरवणीतूनही घातक आजार आपल्याला गाठू शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.