घरच्या घरी करा पार्लरसारखे मॅनिक्युअर आणि पेडीक्योर, जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
चेहऱ्यासोबतच हात आणि पायांची त्वचा स्वच्छ आणि मऊ ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी अनेक पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करतात. पण जर तुम्हाला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे घरी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करू शकता. चला तर मग आजच्या लेखात जाणून घ्या...

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना सौंदर्याची काळजी घेणं जमत नाही. अशातच अनेकजण स्किन केअर करण्यासाठी पार्लरमध्ये जातात. तसेच खास प्रसंगी आकर्षक दिसण्यासाठी चांगले कपडे आणि मेकअप करतात. पण या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आवश्यक असतात, त्या म्हणजे चेहऱ्यासोबतच हात आणि पायांच्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सुंदर, स्वच्छ आणि निरोगी हात आणि पाय तुमचे सौंदर्य वाढवतातच पण तुमचा आत्मविश्वासही वाढवतात. यासाठी बहुतेक महिला मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करतात. पण काही लोकांसाठी, त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतून स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण होऊन जाते.
जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करू शकत नसाल तर तुम्ही ते घरी सहज करू शकता. थोडे प्रयत्न आणि योग्य पद्धतीने तुम्ही घरी पार्लसारखे चांगले परिणाम मिळवू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमचे हात आणि पाय स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
हातांसाठी मॅनिक्युअर
हाताचे मॅनिक्युअर करण्यासाठी सर्वात आधी नखांवरील नेलपॉलिश काढा आणि हात धुवा. यानंतर एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या. आता त्यात थोडा शाम्पू आणि चिमूटभर मीठ घाला. त्यात तुमचे हात 10 ते 15 मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे हात मऊ होण्यास मदत होईल तसेच त्यांच्यावर साचलेली घाणही निघून जाईल. यानंतर, हातांवर स्क्रब लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींनी स्क्रब देखील बनवू शकता. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करेल. त्यांना स्वच्छ केल्यानंतर, तुमच्या नखांना योग्य आकार द्या आणि त्यांना नेक फाईल वापरून गुळगुळीत करा. तुमच्या हातांवर कोणतेही चांगले लोशन किंवा क्रीम लावा आणि 5 ते 10 मिनिटे मसाज करा. यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या नखांवर तुमचे आवडते नेलपॉलिश लावू शकता.
पेडीक्योरसाठी ही पद्धत वापरा
घरी पेडीक्योर करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये कोमट पाण्यात शाम्पू, मीठ आणि अँटीसेप्टिक द्रवाचे काही थेंब मिक्स करा आणि त्यात तुमचे पाय 5 ते 10 मिनिटे बुडवा. काही वेळाने पाण्यातून पाय बाहेर काढा. यानंतर, टाचांची आणि पायांची त्वचा प्युमिस स्टोन किंवा फूट स्क्रबरने स्वच्छ करा. जेणेकरून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकता येतील, त्यानंतर ते टॉवेलने स्वच्छ करा. आता तुमचे नखे कापून फाईल करा. नखांना स्वच्छ आणि गोल आकार द्या जेणेकरून ते तुटणार नाहीत. यानंतर पाय पाण्याने स्वच्छ करा. आता तुमच्या पायांना चांगली फूट क्रीम किंवा नारळाचे तेल लावा आणि पायाच्या अंगठ्या आणि टाचांना चांगली मालिश करा. यामुळे पायांना तसेच शरीरालाही आराम मिळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)