Beauty Care: चेहऱ्याची काळजी करताय? कडूलिंबासोबत या पदार्थांचा करा आवर्जून वापर, त्वचा नैसर्गिकरीत्या उजळून जाईल!

आपल्याला आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर बनवायचे असेल तर अशावेळी काही नैसर्गिक पदार्थांचा वापर देखील करणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण कडुलिंबाच्या वापराने आपल्या त्वचेला कोणकोणते फायदे होतात व कडुलिंबा सोबतच काही पदार्थ वापरल्याने सुद्धा आपली त्वचा सुंदर व डाग विरहित बनवता येते याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.

Beauty Care: चेहऱ्याची काळजी करताय? कडूलिंबासोबत या पदार्थांचा करा आवर्जून वापर, त्वचा नैसर्गिकरीत्या उजळून जाईल!
कडुनिंबाची पाने
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:38 PM

मुंबई : हल्ली प्रत्येकाला त्वचेच्या संदर्भातील वेगळ्या समस्या सतावत असतात. बहुतेक वेळा बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार (Balance diet) यामुळे आपली त्वचा दिवसेंदिवस बिघडत जाते. अनेकांना चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काळे डाग, वांग यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतात. अनेकांना तरुणपणातच चेहऱ्यावर सुरकुत्या (fine lines) निर्माण होतात. ही समस्या बहुतेक वेळा त्रास देते. या सगळ्या समस्या पासून जर मुक्तता मिळवायची असेल तर अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी काही ब्युटी प्रॉडक्ट (Beauty routine) वापरणे गरजेचे आहे पण त्याचबरोबर आपल्या आहार पद्धती वर सुद्धा लक्ष द्यायला हवे. जर आपल्याला आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर बनवायचे असेल तर अशावेळी काही नैसर्गिक पदार्थांचा वापर देखील करणे गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण कडुलिंबाच्या वापराने आपल्या त्वचेला कोणकोणते फायदे होतात व कडुलिंबा सोबतच काही पदार्थ वापरल्याने सुद्धा आपली त्वचा सुंदर व डाग विरहित बनवता येते याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.

कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल व अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही ताज्या कडू लिंबाच्या पानांचा वापर केला तर तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या उजळू लागते त्याचबरोबर कडुलिंबाच्या पानांमध्ये अन्य काही पदार्थांचा समावेश केला तर आपली त्वचा अजूनच सुंदर व कोमल बनू शकते.

कडुलिंब आणि मध

जर तुमची त्वचा तेलकट असेल, तुमच्या त्वचेवर तेलाचा थर जमा होत असेल तर अशावेळी त्वचेची देखभाल करण्यासाठी तुम्ही कडुलिंब आणि मध यांचा फेसपॅक बनवून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा कडुलिंबाची पाने मिक्सर मध्ये वाटून त्यांचा लेप बनवायचा आहे आणि या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळून हा लेप चेहर्‍यावर लावायचा आहे. हा लेप लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं तसेच ठेवायचे आहे. लेप सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील तेलकट पणा कमी होऊन जाईल.

कडुलिंब आणि बेसन

हा लेप बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचा बेसन आणि एक चमचा गुलाबजल तसेच एक चमचा कडुनिंबाच्या पानांची पावडर लागणार आहे. आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून याचा वापर करायचा आहे परंतु ही पेस्ट लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने आवश्य धुवा. हा लेप चेहऱ्यावर लावल्या नंतर पंधरा मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका,असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जर कोणत्याही प्रकारचे डाग, वांग, सुरकुत्या आलेल्या असतील तर त्या दूर होऊन जातील.

कडुलिंब आणि कोरफड

आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर व कोमल बनवण्यासाठी कोरफडचा प्रामुख्याने वापर केला जातो. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल,काळे डाग, सुरकुत्या आल्या असतील तर आपली त्वचा नैसर्गिकरीत्या सुंदर बनवण्यासाठी कोरफड अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्या चेहऱ्याची त्वचा जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला एका वाटीमध्ये एक ते दोन चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर द्यायची आहे आणि त्यामध्ये कोरफड जेल टाकायचा आहे ,आता हे मिश्रण एकजीव करून आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. काही वेळ मिश्रण चेहर्‍यावर ठेवल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे,असे केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील कोणत्याही प्रकारचे डाग लवकर निघून जाईल. तुमच्या चेहऱ्यावर जर मृतपेशी असतील त्या सुद्धा निघून जातील

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या :

Holi 2022: रंगामुळे केसांना हानी पोहचू नये म्हणुन अशाप्रकारे घ्या आपल्या केसांची काळजी, या काही ब्युटी टीप्स फॉलो करा

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.