AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी रिकाम्यापोटी ‘हा’ ज्यूस प्यायल्यास पिंपल्स होतील दूर, आजारांपासूनही होईल सरंक्षण

आवळ्याचे सेवन तुमच्या शरीरासाठी फायदेशीर मानलं जाते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या शरीराला निरोगी राहाण्यास मदत होते.

दररोज सकाळी रिकाम्यापोटी 'हा' ज्यूस प्यायल्यास पिंपल्स होतील दूर, आजारांपासूनही होईल सरंक्षण
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:46 PM
Share

तज्ज्ञांकडून दररोज सकाळी एक आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये देखील आवळ्याचे असंख्य फायदे दिले आहेत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. रिकाम्यापोटी आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. आजकाल अनेकजण व्यायाम केल्यानंतर किंवा सकाळी योगा केल्यानंतर आवळ्याचा रस पिण्यास पसंती देतात. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

आवळ्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमककुवत असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. आवळ्यामधील एंटीऑक्सीडेंट्स तुम्हाला संसर्गाच्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.

आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे

आवळ्याचा रस दररोज सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमचा अपचन अॅसिडिटी गॅस आणि बद्धकोष्ठता यांच्यासारख्या समस्या कममी होण्यास मदत होते. आवळा तुमच्या पोटामधील बॅक्टिरिया बाहेर काढण्यास मदत होते.

सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचा रस प्यायल्याामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी तुमच्या चोहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुमाचे डाग कमी होण्यास मदत होते. आवळ्याच्या ज्यूसमुळे तुमचं शरीर डिटॉक्सीफाय होते आणि त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

तुमचे पांधरे केस काळे करण्यासाठी आवळ्याचे सेवन फायदेशीर ठरते. तुम्हाला जर केसगळती, केसामध्ये कोंड्याची समस्या असेल तर दररोज सकाळी एक छोटा ग्लास आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे तुमची केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण अनेकवेळा जंक फूडचे सेवन करतो. जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन वाढते. जंक फूडचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय बिघडते. सकाळी रिकाम्यापोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि नियमित आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

तुम्ही आवळ्याच्या ज्यूसमध्ये थोडं आल्याचा रस आणि लिंबू पिळल्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मददत होते. त्योसबतच तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होतेय या रसाचे सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!