Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी ‘हे’ आयुर्वेदिक तेल लावा, नैसर्गिकरित्या सुंदर चेहरा मिळवा!

त्वचा चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक औषधी वनस्पती आणि तेल वापरू शकता. आयुर्वेदात कुमकुमाडी तेल नैसर्गिक औषधी वनस्पती आणि तेलांचे मिश्रण करून तयार केले गेले आहे.

Skin Care : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' आयुर्वेदिक तेल लावा, नैसर्गिकरित्या सुंदर चेहरा मिळवा!
सुंदर त्वचा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Aug 09, 2021 | 2:08 PM

मुंबई : त्वचा चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक औषधी वनस्पती आणि तेल वापरू शकता. आयुर्वेदात कुमकुमाडी तेल नैसर्गिक औषधी वनस्पती आणि तेलांचे मिश्रण करून तयार केले गेले आहे. याला कुंकुमाडी तेलम असेही म्हणतात. हे एक आयुर्वेदिक तेल आहे. जे त्वचेला चमक आणण्यास मदत करते. हे तुमच्या त्वचेवर फेशियल, मॉइश्चरायझर, क्लीन्झर आणि टोनर म्हणून काम करते. ते त्वचेसाठी कसे फायदेशीर हे बघूयात. (Apply this ayurvedic oil before going to bed at night and get beautiful skin)

नैसर्गिक चमक मिळते 

हे तेल नैसर्गिक आणि सेंद्रिय औषधी वनस्पतींचे मिश्रण करून बनवले जाते. जे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करतात. यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे त्वचेमध्ये रक्त परिसंचरण वाढवतात आणि पेशींचे पोषण करतात. लाल आणि सोनेरी रंगाचे केशर हे त्याचे मुख्य घटक आहे. जे नैसर्गिकरित्या त्वचेसाठी काम करते. हे आपली त्वचा तरुण आणि सुंदर ठेवण्यास मदत करते.

त्वचेचा टोन

आपल्या सौंदर्य दिनक्रमात कुमकुमादी तेलाचा समावेश केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. झोपेच्या आधी त्वचेला हळूवारपणे मालिश करा. यामुळे त्वचेचा रंग उजळतो. नियमित मालिश केल्याने बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या दूर होते.

त्वचेची जळजळ कमी होते

कुमकुमाडी तेलात अँटी-सेप्टिक, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. या तेलात असलेल्या औषधी वनस्पती खाज, जळजळ आणि पुरळ कमी करण्यास मदत करतात. चहाच्या झाडाच्या तेलात नियमितपणे हे तेल मिसळल्याने त्वचेची जळजळ आणि चेहऱ्यावरील चट्टे कमी होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग 

या तेलात चंदन, केशर आणि हळद आहे. जे अँटी-ऑक्सिडंट गुणांनी समृद्ध आहेत. हे तेल सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही संरक्षण करते.

मुरुमाची समस्या दूर

कुमकुमादी तेल त्वचेवरील मुरुमाला दूर करते. हे तेल त्वचेतील क्लीन्झरसारखे काम करते. हे त्वचेत जमा झालेली घाण साफ करण्याचे काम करते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. जे मृत त्वचेपासून मुक्त होण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this ayurvedic oil before going to bed at night and get beautiful skin)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें