AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकडी आणि लिंबूची ‘ही’ पेस्ट दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची तेवढी काळजी घेणे देखील आवश्यक असते. यासाठी आपण बाजारातून महागड्या क्रिम आणून चेहऱ्याला लावल्या पाहिजेत.

काकडी आणि लिंबूची 'ही' पेस्ट दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची तेवढी काळजी घेणे देखील आवश्यक असते. यासाठी आपण बाजारातून महागड्या क्रिम आणून चेहऱ्याला लावल्या पाहिजेत, असे काहीही नाहीतर आपण काही घरगुती उपाय करूनही चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील लागत नाही. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, काकडी आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे. (Apply this paste of cucumber and lemon on the face and get beautiful skin)

आपण जर दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला काकडी आणि लिंबूची पेस्ट लावली तर आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होतील. ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी काकडी आणि तीन चमचे लिंबाचा रस लागणार आहे. काकडीची चांगली पेस्ट तयार करून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहऱ्या कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण सतत आठ दिवस लागली तर आपल्याला त्वचेमध्ये मोठा बदल जाणवेल.

काकडी आणि पुदीना देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. काकडी आणि पुदिन्याची चांगली पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठ दिवसांमधून तीन वेळा आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

कलिंगड, काकडी आणि दह्याचा फेसपॅक घरचे-घरी तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगडचे दोन काप, अर्धी काकडी आणि चार चमचे दही लागणार आहे. काकडी आणि कलिंगडची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Apply this paste of cucumber and lemon on the face and get beautiful skin)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.