Health Tips : आरोग्याच्या अनेक समस्यांवर शेपू गुणकारी, फायदे जाणून घ्या!

शेपूची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज समृद्ध असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Health Tips : आरोग्याच्या अनेक समस्यांवर शेपू गुणकारी, फायदे जाणून घ्या!
शेपूची भाजी

मुंबई : शेपूची भाजी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शेपू व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज समृद्ध असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण जास्त करून शेपूची भाजी खाण्यावर भर देतो. मात्र, शेपूचा चहा देखील तयार करता येतो. शेपूचा चहा देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासह आपण बटाटा मिक्स करूनही शेपूची भाजी तयार करू शकतो. शेपू खाण्याचे आरोग्याला नेमके कोण-कोणते फायदे आहेत. हे आज आपण बघणार आहोत. (Dill leaves are beneficial for health)

पोषक घटक समृद्ध

शेपूमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. हे चयापचयला देखील चालना देण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन ए असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. या व्यतिरिक्त कॅल्शियम आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. यासाठी आपण दररोजच्या आहारात शेपूचा समावेश हा केला पाहिजेत.

पाचक प्रणालीसाठी फायदेशीर

शेपू पचनशक्ती चांगली होण्यास मदत करते. कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे गॅस, अपचन या समस्या दूर होण्यास मदत होते. हे फायबरमध्ये समृद्ध आहे जे बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. शेपू गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. हे आपल्या पाचक प्रणालीला बळकट करण्यासाठी कार्य करते.

निद्रानाश

निद्रानाश हा एक व्याधी आहे. ज्यामध्ये एखाद्याला झोपायला त्रास होतो. हा आजार कधीही होऊ शकतो. व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच लोक झोपत नाहीत. झोपेच्या कमतरतेमुळे ते आळशी आणि चिडचिडे होतात. शेपूमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी असते, जे निद्रानाश आजार दूर करण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामुळे ताण कमी होतो.

वजन कमी करण्यास मदत करते

शेपू अॅन्टी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असतात आणि त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. हे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आपण आपल्या सकाळच्या चहामध्ये किंवा ग्रीन टीमध्ये शेपूची पाने मिक्स करून पिऊ शकतात. हे चरबी बर्न करण्यास मदत करते. दररोजच्या आहारात शेपूचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Dill leaves are beneficial for health)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI