Skin Care : ग्लोईंग त्वचा हवी आहे? तर संत्रीच्या सालीचा आणि केळीचा ‘हा’ फेसपॅक वापरा!

जर आपल्याला खरोखरच सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण आपल्या चेहऱ्यासाठी फळांचे फेसपॅक नेहमीच वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल.

Skin Care : ग्लोईंग त्वचा हवी आहे? तर संत्रीच्या सालीचा आणि केळीचा 'हा' फेसपॅक वापरा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:25 AM

मुंबई : जर आपल्याला खरोखरच सुंदर आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण आपल्या चेहऱ्यासाठी फळांचे फेसपॅक नेहमीच वापरले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याचे कोणतेही नुकसान होत नाही. या फेसपॅकमुळे एक नैसर्गिक चमक आपल्या त्वचेवर येईल. यासाठी आपण नेहमीच फळांचे फेसपॅक वापरले पाहिजेत. (Beneficial for face with orange peel and banana face pack)

विशेष म्हणजे फक्त फळच नाहीतर आपण फळांच्या सालीचे देखील फेसपॅक वापरू शकतो. हे फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, केळी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायेदशीर आहे. मात्र, केळी फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आपण घरचे-घरी केळीची विविध फेसपॅक तयार करू शकतो.

केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक केळी, संत्रीच्या सालीचे पावडर तीन चमचे आणि गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. संत्र्याच्या सालीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते.

यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, नैसर्गिक स्वरुपात तेलाचा होणारा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात आणण्याचे गुणधर्म, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल यासह अनेक गुणधर्म आहेत. संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून त्यामध्ये मध मिक्स करा व हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावा. यामुळे त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचेवरील रोमछिद्रांची खोलवर स्वच्छता होते.

त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. केळीच्या सालीमध्ये मध आणि हळद मिसळा. हे मिश्रण केळ्यासह चेहऱ्यावर घासून घ्या. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर हे तसेच ठेवा. नंतर ते पाण्याने धुवा आणि एका कपड्याने चेहरा पुसा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Beneficial for face with orange peel and banana face pack)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.