त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे Brown Rice; जाणून घ्या कसा वापर करायचा

यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे असतात. तपकिरी तांदळामध्ये प्रथिने असतात. (Brown rice is beneficial for skin and hair health; know how to use)

त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे Brown Rice; जाणून घ्या कसा वापर करायचा
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तपकिरी तांदूळ

मुंबई : तपकिरी रंगाचा तांदूळ मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, जस्त, लोह आणि सेलेनियम यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांनी समृद्ध असतो. यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे असतात. तपकिरी तांदळामध्ये प्रथिने असतात. तसेच फायबरही खूप प्रमाणात असते. हे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर केस आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर आहे. (Brown rice is beneficial for skin and hair health; know how to use)

चमकदार त्वचेसाठी उपयुक्त

तपकिरी तांदळामध्ये असलेले सेलेनियम त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. चमकदार त्वचेला उपयुक्त प्रकारचा पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला 2 चमचे तपकिरी तांदूळ आणि 1 चमचा दही घ्यावे लागेल. प्रथम तपकिरी तांदूळ बारीक करा. एक चमचा साधा दही घेऊन त्यात अर्धा चमचा बारीक केलेला तांदूळ मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहर्‍यावर लावा. सुमारे 10 मिनिटे असेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 2 वेळा हा प्रयोग करू शकता. यानंतर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार झालेली पाहायला मिळेल.

मुरुमांवर उपचार करण्यासाठी

तपकिरी तांदळामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतात. या गुणधर्मांमुळे तपकिरी तांदूळ डाग आणि मुरुमांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करतो. तपकिरी तांदूळ मुरुमांभोवती येणारा लालसरपणा कमी करण्यास मदत करतो. या तांदळापासून फेस पॅक तयार करू शकता. यासाठी तुम्हाला 2 चमचे तपकिरी तांदूळ पाणी बनवावे लागेल. या तांदळाच्या पाण्यात कापसाचा बोळा बुडवून तुमच्या त्वचेवर मुरूम असलेल्या भागावर लावा. काही वेळ ते कोरडे होऊ द्या. साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवा. तुम्ही आठवड्यातून तीन दिवस हा प्रयोग करू शकता.

केस निरोगी ठेवण्यासाठी फायदे

केस निरोगी ठेवण्यासाठी तपकिरी तांदूळ चांगला फायदेशीर मनाला जातो. त्यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, फोलासिन, पोटॅशियम आणि फायबर असतात. हे सर्व घटक निरोगी केसांसाठी आवश्यक आहेत. तपकिरी तांदूळ या सर्व पोषक तत्वांनी समृद्ध असतो. तांदळातील विविध पोषक तत्त्वांमुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

केस गळणे थांबते

केस गळणे थांबवण्यासाठीही तुम्ही तपकिरी तांदूळ वापरू शकता. तपकिरी तांदळामध्ये प्रथिनेही असतात. हे टाळूसाठी फायदेशीर आहे. केस गळणे कमी करण्यासाठी तपकिरी तांदळाचा वापर करून पॅक बनवता येतो. यासाठी 3-4 चमचे तपकिरी तांदूळ, 1 अंडे आणि 1 कप पाणी घ्या. अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये तांदूळ मिसळा आणि त्यात एक कप पाणी घाला. हे मिश्रण केसांवर लावा आणि 10 मिनिटांनंतर केस धुवा. तुमचे केस स्वच्छ करण्यास, घाण व तेल काढून टाकण्यास याची मदत होईल. (Brown rice is beneficial for skin and hair health; know how to use)

इतर बातम्या

शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल ‘माँ, तुझे सलाम’

Maruti च्या गाड्यांसाठी घरबसल्या लोन मिळणार, एक्सचेंज व्हॅल्यूसाठी शोरुममध्ये जाण्याची गरज नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI