लवंगाचे पाणी केसांसाठीही फायदेशीर, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
तुम्हाला जर तुमचे केस नैसर्गिकरित्या निरोगी आणि सुंदर बनवायचे असतील तर लवंगाच्या पाण्याचा योग्य वापर करा. ते बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत आणि त्यातून मिळणारे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊयात

सुंदर, दाट आणि मजबूत केस जवळजवळ प्रत्येकालाच हवे असतात. मात्र वाढते प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी, रासायनिक उत्पादने आणि तणाव यांमुळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे केस गळणे, कोंडा होणे, स्कॅल्प इन्फेक्शन आणि स्प्लिट एंड्स सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही नैसर्गिक आणि प्रभावी उपाय शोधत असाल तर लवंग पाणी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही.
लवंग, जे सामान्यतः आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात असते, तर लंवग हे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. तर लंवगापासून तयार केलेले पाणी हे केवळ टाळूच निरोगी बनवत नाही तर केसांची मुळे देखील मजबूत करतात. ज्यामुळे केसांची वाढ जलद होते. लवंगात असलेले युजेनॉल हे घटक टाळूची खोल साफ करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
केसांसाठी लवंग पाण्याचे फायदे
लवंगाचे पाणी केसांसाठी आयुर्वेदिक टॉनिकपेक्षा कमी नाही. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल्स आणि पोषक घटक केसांना मजबूत बनवण्यास तसेच टाळूशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया लवंगाच्या पाण्याचे केसांना होणारे उत्तम फायदे.
- 1. लवंगामध्ये असलेले युजेनॉल नावाचे तत्व टाळूमध्ये रक्त परिसंचरण वाढवते, ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
- 2. लवंगाच्या पाण्यात अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे स्कॅल्पमधून बुरशी आणि कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. हे टाळूला खोलवर स्वच्छ करते आणि खाज येण्याची समस्या देखील दूर करते.
- 3. जर तुम्हाला लांब आणि दाट केस हवे असतील तर लवंग पाणी एक चांगला पर्याय आहे. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.
- 4. जर तुमचे केस वारंवार तेलकट होत असतील तर लवंगाचे पाणी टाळूमधील सीबमचे उत्पादन संतुलित करण्यास मदत करते, ज्यामुळे केस अधिक काळ ताजे आणि निरोगी दिसतात.
लवंग पाणी कसे तयार करावे
कढईत पाणी गरम करून त्यात लवंगा घाला. 10-15 मिनिटे मंद आचेवर उकळा. पाण्याचा रंग बदलून हलका तपकिरी होईल. त्यानंतर कढई आचेवरून काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि स्प्रे बाटलीमध्ये भरा.
केस लावण्याची पद्धत
- 1. केस धुतल्यानंतर किंचित ओल्या केसांवर लवंगाचे पाणी स्प्रे करा. बोटांनी हलके मसाज करा जेणेकरून ते टाळूमध्ये चांगले शोषले जाईल. त्यांनतर केस धुण्याची गरज नाही, तुम्ही ते नैसर्गिक हेअर टॉनिक म्हणून वापरू शकता.
- 2. शॅम्पू केल्यानंतर केस चांगले धुवा. आता लवंगाचे पाणी केसांवर आणि टाळूवर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतील.
- 3. खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये 2-3 चमचे लवंग पाणी मिसळा. ते थोडेसे गरम करा आणि या मिश्रणाने टाळूला नीट मसाज करा. रात्रभर केस तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. यामुळे केसांची वाढ जलद होईल आणि केस मुळापासून मजबूत होतील.
- 4. मेथी पावडर, आवळा पावडर किंवा कोरफड जेलमध्ये लवंगाचे पाणी मिसळा. हे मिश्रण केसांना लावा आणि 30 मिनिटे राहू द्या. नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. यामुळे केसांना डीप कंडिशनिंग मिळेल आणि केस दाट होतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)