AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : ‘हे’ फेस टोनर चेहऱ्यासाठी वापरा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता.

Skin care : 'हे' फेस टोनर चेहऱ्यासाठी वापरा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आज आम्ही एक खास फेस टोनर घरच्या घरी कसे तयार करायचे हे सांगणार आहोत. (Coconut water face toner is beneficial for beautiful skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण फेस टोनर म्हणून नारळाचे पाणी वापरू शकता. यासाठी प्रथम कढईत थोडेसे पाणी उकळवा आणि त्यात ग्रीन टी घाला. सुमारे दोन मिनिटे मंद आचेवर शिजवा. यानंतर, ग्रीन टी गाळून घ्या आणि पाणी थंड होऊ द्या. पाणी चांगले थंड झाल्यावर त्यात 2 चमचे गुलाब पाणी आणि 3 चमचे नारळ पाणी घाला. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि चेहरा साफ केल्यानंतर दररोज सकाळी टोनर म्हणून वापरा.

नारळाचे सेवन करून आपण शरीराला हायड्रेटेड ठेवून, किडनी स्टोनचा आजार टाळू शकता आणि नारळपाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी एक चांगला स्त्रोत आहे. नारळपाण्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी होऊन हृदयरोग होण्याचा धोकाही कमी होतो. नारळाच्या पाण्यात पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध नारळपाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून इतर रोगांशी लढण्यासही मदत करतो.

नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास सिस्टममध्ये अँटीऑक्सिडंट्स वाढण्यास मदत होते. हे अँटीऑक्सिडेंट त्वचेवर मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकते, बारीक रेषा, सुरकुत्या आणि बऱ्याच समस्या दूर होतात. आपल्याला नारळपाण्याचे सेवन करण्याची सवय असते, त्यामुळे ते थेट त्वचेवर देखील लागू होते. हळद, बेसन आणि थोडे नारळ पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि आपल्या चेहर्‍यावर लावा. हे घरगुती उपचारांमध्ये गुलाबाच्या पाण्याला पर्याय म्हणून देखील वापरले जाऊ शकते.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

(Coconut water face toner is beneficial for beautiful skin)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.