AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips: पिंपल्समुळे त्रस्त आहात? अंघोळीपूर्वी चेहऱ्यवर ‘या’ गोष्टी वापरा सर्व समस्या होतील दूर….

Skincare Tips:आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे चेहऱ्यावरील डाग, मुरुमे आणि कोरडेपणा ही एक सामान्य समस्या आहे. पिंपल्सच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक क्रिम्स वापरल्या जातात. परंतु मार्केटमधील क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी चमकदार आणि निस्तेज त्वचेसाठी नेमकं काय करावे?

Beauty Tips: पिंपल्समुळे त्रस्त आहात? अंघोळीपूर्वी चेहऱ्यवर 'या' गोष्टी वापरा सर्व समस्या होतील दूर....
Skincare TipsImage Credit source: freepik
| Edited By: | Updated on: Feb 10, 2025 | 2:35 PM
Share

सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेक प्रयोग केले जातात. चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करतात. परंतु फेशियल क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक पदार्थ असतात ज्यामुळे चेहरा खराब होऊ शकतो. जास्त प्रमाणात मार्केटमधील क्रिम्स वापरल्यामुळे तुम्हाला पिंपल्सच्या समस्या उद्भवू शकतात. त्यासोबतच वातावरणातील प्रदुषणामुळे आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर बारिक पुरळ येतात. चेहऱ्यावरील बारीक पुरळ काही काळानंतर लाल होतात ज्यामुळे सनबर्न आणि पिग्मेंटेशन सारख्या समस्या उद्भवतात. वातावरणातील सूर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

जेव्हा सूर्यप्रकाश थेट तुमच्या चेहऱ्याच्या संपर्कात येतो त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर डाग, मुरुमे, सुरकुत्या आणि इतर समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये, तुम्हाला तुमची त्वाचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर अंघोळीपूर्वी काही घरगुती उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात काही दिवसांतच फरक दिसून येईल. चला तर जाणून घेऊया अळा 5 गोष्टी ज्या केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी होते आणि पिंपल्स मुरूम सारख्या समस्या होतील दूर.

कोरफड जेल

कोरफड तुमच्या त्वचेसाठी एक चमत्कारिक उपाय मानला जातो. कोरफडमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि चेहऱ्यावरील डाग कमी करतात. आंघोळीपूर्वी, ताजे कोरफडीचे जेल काढा आणि ते चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर आंघोळ करा. कोरफड त्वचा स्वच्छ करते तसेच ती मऊ आणि चमकदार बनवते. कोरफड जेलच्या नियमित वापराने, मुरुमे आणि डाग हळूहळू नाहीसे होतील.

हळद आणि दह्याचा पॅक

हळद आणि दही यांचे मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा घटक असतो, जो त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतो. त्यासोबतच दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि चमकदार बनवते. आंघोळीपूर्वी एक चमचा दह्यात चिमूटभर हळद मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी आंघोळ करा. हा पॅक त्वचेचा रंग स्वच्छ करण्यास आणि डाग हलके करण्यास मदत करेल.

लिंबाचा रस

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेवरील डाग कमी करण्यास आणि त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. आंघोळीपूर्वी, चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर आंघोळ करा. लक्षात ठेवा की लिंबाचा रस त्वचेला थोडा संवेदनशील बनवू शकतो, म्हणून आठवड्यातून फक्त 2-3 वेळाच वापरा. नियमित वापरामुळे त्वचेचा रंग सुधारेल आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

मध आणि दालचिनी पावडर

मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेला आद्रता देते आणि ती मऊ करते. दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. आंघोळीपूर्वी, एक चमचा मधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी आंघोळ करा. या पॅकमुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास आणि ती चमकदार होण्यास मदत होईल.

बेसन आणि गुलाबपाणी

बेसन त्वचेला एक्सफोलिएट करण्यास आणि स्वच्छ करण्यास मदत करते. त्याच वेळी, गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते आणि तिला शांत करते. आंघोळीपूर्वी बेसन आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी आंघोळ करा. हा पॅक डाग कमी करण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत करेल. नियमित वापरामुळे त्वचेचा रंग सुधारेल आणि त्वचा चमकदार होईल.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.