Hair care : केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय करा!

चमकदार आणि सुंदर केस प्रत्येकाला पाहिजे असतात. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमध्ये आणि चुकीच्या आहारामुळे केस कोरडे होण्याच्या समस्येमध्ये वाढ होत आहे.

Hair care : केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी 'हे' 5 नैसर्गिक उपाय करा!
केस

मुंबई : चमकदार आणि सुंदर केस प्रत्येकाला पाहिजे असतात. मात्र, बदलेल्या जीवनशैलीमध्ये आणि चुकीच्या आहारामुळे केस कोरडे होण्याच्या समस्येमध्ये वाढ होत आहे. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण विविध उत्पादनांचा वापर करतो. पण तरीही कोरड्या केसांची समस्या दूर होत नाही. कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Do these 5 natural remedies to remove dryness of hair)

अॅवकाडो

अॅवकाडो जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिडस् समृद्ध असते. आपल्या केसांसाठी अॅवकाडो अत्यंत फायेदशीर आहे. केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी अॅवकाडो वापरू शकता. अॅवकाडोचा गर आणि अंडी मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास नक्की मदत होईल.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. केसांच्या स्टाईलिंग उपचारामुळे केस खराब होतात आणि कोरडे होतात. कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. एक कप ऑलिव्ह ऑईल गरम करून केसांची मालिश करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुला. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होईल.

कोरफड जेल

कोरफड जेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे टाळूमध्ये खाज सुटण्यापासून बचाव करण्यासाठी कार्य करतात. कोरफडच्या जेलमध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि केसांवर लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल साइडर व्हिनेगर आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे जे केसांना नुकसानापासून वाचवते. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये दोन चमचे ऑलिव्ह तेल, 2 अंडी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर लावा आणि थंड पाण्याने केस धुवा.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Do these 5 natural remedies to remove dryness of hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI