कोरोना काळात ‘हा’ व्यायाम करा अनेक आजार पळतील दूर !

सतत सुरू असलेली आपली धावपळ यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

कोरोना काळात ‘हा’ व्यायाम करा अनेक आजार पळतील दूर !
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 28, 2021 | 9:23 AM

मुंबई : सतत सुरू असलेली आपली धावपळ यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. असे म्हणतात की, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकता. केवळ व्यायामामुळेच आपले शरीर तंदुरुस्त राहू शकते. विशेष म्हणजे व्यायाम केल्याने आपण मोठ्या आजारांपासून देखील दूर राहू शकतो. (Special tips for exercising)

व्यायाम करणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर देखील जाऊ शकत नाहीत. देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यायाम करणे बंद देखील केले आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातच आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. कारण या काळात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे.

घरात राहून नेमका कोणता व्यायाम करावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी राहाल तसेत तुमचे वजन देखील वाढणार नाही आणि तुम्ही घरचे घरी हा व्यायाम करू शकणार आहेत. दोरीवरच्या उड्या बहुतेक लोकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.

दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Special tips for exercising)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें