Skin Care : ‘हे’ घरगुती उपाय करा आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या दूर करा!

त्वचेवरील गडद डागांना हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात गडद डाग असतात. चेहऱ्यावरील हे डाग काढण्यासाठी विविध उपचार केले जातात.

Skin Care : 'हे' घरगुती उपाय करा आणि हायपरपिग्मेंटेशनची समस्या दूर करा!
त्वचा
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 12:44 PM

मुंबई : त्वचेवरील गडद डागांना हायपरपिग्मेंटेशन म्हणतात. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात गडद काळे डाग असतात. चेहऱ्यावरील हे डाग काढण्यासाठी विविध उपचार केले जातात. मात्र, तरीही चेहऱ्यावरील डाग जात नाहीत. आपण काही घरगुती उपचारांद्वारे  डागांची समस्या दूर करून शकतो. विशेष म्हणजे या घरगुती उपचाऱ्यांमुळे आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत. (Do this home remedy to get rid of the problem of hyperpigmentation)

सनस्क्रीन

बहुतेक लोक उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन वापरतात, कारण सनस्क्रीनमुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. पावसाळ्यात हंगामात सूर्यप्रकाशापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे कार्य करते. अॅपल व्हिनेगरमध्ये पॉलिफेनोलिक संयुगे असतात. चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी अॅपल व्हिनेगर अत्यंत फायदेशीर आहे. आपण दररोज अॅपल व्हिनेगरचा वापर करू शकतो.

बटाटा

बटाटे अँटी-पिग्मेंटेशन गुणधर्मांकरिता ओळखले जातात. चेहऱ्यावरील काळ्या डागांवर आपण बटाटे लावू शकतो. यासाठी बटाटा अर्धा कापून घ्या. हा कापलेला बटाटा पाण्यात बुडवा. नंतर बटाटा काळ्या डागांवर गोलाकर फिरवा आणि मालिश करा. आठवड्यातून तीन ते चार वेळा आपण असे केले पाहिजे.

मॉइश्चरायईज

तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

नारळ तेल 

नारळ तेल आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. हे आपल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. हे अतिनील किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्यास मदत करते. नारळ तेलाने त्वचेची संपूर्ण मालिश करा. जेणेकरून ते आपल्या त्वचेमध्ये खोलवर शोषू शकेल. नारळ तेलाने चेहऱ्याची मालिश केल्यानंतर दहा मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Do this home remedy to get rid of the problem of hyperpigmentation)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.