Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा!

पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स जावे आणि आपला चेहरा चमकदार बनावा.

Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!
हेअर मास्क
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 9:36 AM

मुंबई : पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स जावे आणि आपला चेहरा चमकदार बनावा. मात्र, बऱ्याचवेळा हे सर्व करूनही काहीच होत नाही. परंतू आपल्याला हे माहिती आहे का, आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याचा वापर आपण करून आपला चेहरा सुंदर करू शकतो. (Do this home remedy to get rid of the problem of pimples on the face)

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आपण दररोज आपल्या चेहऱ्याला बेसन पीठामध्ये लिंबू मिक्स करून लावले पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण हळद, लिंबू, मुलतानी माती, चंदन पावडर, खोबरेल तेल आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ही पेस्ट तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील. दोन चमचे दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि थोडावेळ तशीच ठेवा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा पॅक आपला चेहराचा रंग गोरा करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get rid of the problem of pimples on the face)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.