AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळीची साल तुम्ही सुद्धा कचरा समजून फेकून देता का? तर जाणून घ्या केळीच्या सालीचे त्वचेला होणारे आश्चर्यकारक फायदे

केळी मुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण केळी खाल्ल्यानंतर त्याची साल कचरा समजून फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का केळीची साल कचरा नसते. केळीचे साल तुमच्या त्वचेला अनेक आश्चर्यकारक फायदे देऊ शकते.

केळीची साल तुम्ही सुद्धा कचरा समजून फेकून देता का? तर जाणून घ्या केळीच्या सालीचे त्वचेला होणारे आश्चर्यकारक फायदे
| Edited By: | Updated on: Jan 28, 2025 | 9:39 PM
Share

केळी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. केळी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि पचनसंस्था ही निरोगी राहते. पण केळी खाल्ल्यानंतर त्याची साल लगेच फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की केळीची साल ज्याला आपण निरुपयोगी समजतो आणि कचरा म्हणून टाकून देतो ती आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केळीची साल कचरा नसून ती तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले पोषक आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म फकत तुमची त्वचा सुधारत नाही तर ती निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करते.

  • केळीच्या सालीचे फायदे
  • मुरूम काढून टाकते
  • केळीच्या सालीमध्ये अँटीबॅक्टरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे मुरूम कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेवरील
  • अतिरिक्त तेल आणि घाण काढून पिंपल्सची समस्या कमी करते.

त्वचेला देते चमक

केळीच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट त्वचेचे पोषण करतात आणि ती सुधारतात. यामुळे त्वचेचा निस्तेज पणा कमी होतो आणि त्वचा चमकदार बनते. केळीच्या सालीचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्याला एक वेगळीच चमक येते.

डार्क सर्कल्स कमी करते

जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील म्हणजेच तुम्हाला डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर केळीच्या सालीचा वापर करा. केळीची साल डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातील पोषक घटक त्वचेला हायड्रेट करतात आणि डार्क सर्कल्स हलके करण्यास मदत करतात.

सुरकुत्या कमी करते

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासही केळीची साल मदत करते. त्याच्या वापरामुळे त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचा घट्ट करतात आणि सुरकुत्या कमी करतात.

  • त्वचेवर होणारी जळजळ आणि खाज कमी करते
  • जळजळ होणे किंवा कोणत्याही प्रकारची एलर्जी होत असेल तर केळीची साल प्रभावित भागावर चोळा. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. याशिवाय हे लावल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.

असा करा केळीच्या सालीचा वापर

त्वचेवर थेट लावा: केळीच्या सालीच्या आतील भाग प्रभावित भागावर हलक्या हाताने घासून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे मुरूम आणि डार्क सर्कल्स कमी होतील.

फेस मास्क तयार करा: केळीची साल बारीक करून त्यात मध आणि लिंबाचा रस घालून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. हा फेस पॅक त्वचेला उजळ आणि चमकदार व्हायला मदत करतो.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.