महिलांनो ओठांवर लावलेली लिपस्टिक खाताय? वेळीच व्हा सावध, धक्कादायक माहिती समोर!
अनेक महिलांना लिपस्टिक लावण्याची आवड असते. मात्र हीच आवड महिलांना मोठी अडचणीची ठरू शकते.

प्रत्येक महिला ओठ लाल, गुलाबी करण्यासाठी लिपस्टिकचा वापर करतात. अनेक महिला ऑफिसला जाताना लिपस्टिक न विसरता लावतात. ओठांना लावलेली थोडी लिपस्टिक पोटात गेली तर काय फरक पडतो, असे अनेक महिला म्हणतात. पण लिपस्टिक लावण्याची हीच सवय कधीकधी फार महागात पडू शकते. महिलांना लिपस्टिकमुळे गंभीर आजारांना तोंड द्यायला लागू शकतं.
लिपस्टिक खाल्ल्याने नेमके काय होते?
महिला जी लिपस्टिक लावतात, त्याली काही लिपस्टिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षणे त्यांच्या पोटात जात असते. पाणी पिताना, जेवण करताना महिला नकळतपणे ही लिपस्टिक खातात. एकदा लिपस्टिक खाल्ल्यानमंतर महिला रोज चहा पिणे, पाणी पिणे, जेवण करणे आदी दैनंदिन कामे करतात. असे करताना महिलांच्या पोटात कळत-नकळतपणे लिपस्टिक जाते. लिपस्टिकमध्ये अनेक रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
थायरॉईड, कॅन्सर यासारखे आजार होण्याची भीती
लिपस्टिकमध्ये असलेला फ्लोरीन हा घटक यकृतासंबंधीच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो. फ्लोरीनमुळे पचनप्रक्रियेवरही परिणाम पडतो. फ्लोरीनमुळे महिलांना थायरॉईड आजारही होऊ शकतो. त्यामुळे लिपस्टिक नेहमीच पोटात जात असेल तर फ्लोरीनमुळे कर्करोगासारखाही गंभीर आजार होऊ शकतो.
लिपस्टिक लावताना काय काळजी घ्यावी?
दरम्यान, या सर्व शक्यता लक्षात घेऊन महिलांनी लिपस्टिक लावताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उत्तम ब्रँड असलेल्या तसेच चांगले घटक वापरून तयार केलेल्या लिपस्टिकच वापराव्यात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
