AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिळाचा वापर करा आणि निरोगी राहा! फक्त खाण्यासाठी नव्हे तर तिळाचे अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

Beauty Tips : हिवाळा सुरु झाला की जानेवारी महिन्यात तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणत लोक एकमेकांना तीळगुळ, तिळाचे लाडू एकमेकांना देऊन शुभेच्छा देतात. तिळाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. तिळाचे अनेक फायदे आहेत. तीळ उष्ण असल्याने ते खास करुन हिवाळ्यात खाल्ले जातात. आयुर्वेदात तिळाला बलवर्धक मानलं जातं. तिळाचे अनेक फायदे आहेत. आज आपण ते फायदे जाणून घेणार आहोत.

तिळाचा वापर करा आणि निरोगी राहा! फक्त खाण्यासाठी नव्हे तर तिळाचे अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर
sesame seeds (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 2:46 PM
Share

मुंबई : तिळाचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिखट चटणीपासून गोड पदार्थ बनविण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत. अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो.

तिळाचा तेलाचा हिवाळ्यात जबरदस्त फायदा होतो. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप फायदा होतो. आठवड्यातून 2 वेळा तरी आंघोळीला जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा मसाज करा. तिळाचं तेल गरम असल्याने त्याने शरीराला मसाज केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाच्या तेलाने मसाज केल्यावर साधारण एक तासाने गरम पाण्याने आंघोळ करा.

केसासाठी तिळाचं तेल उत्तम

त्वचेसाठी जसं तिळाचं तेल फायदेशीर आहे तसंच केसासाठी तिळाचं तेल उत्तम आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे केसात कोंडा होतो आणि केस कोरडे राठ वाटतात. अशावेळी हिवाळ्यात केसांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास केसाची पोत सुधारते. केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेलात तिळाचं तेल मिक्स करा आणि या मिक्स केलेल्या तेलाने केसांमध्ये मसाज करा. साधारण तासाभरानंतर गरम पाण्याने केस धुवून टाका.

तिळाचा स्क्रब म्हणून उपयोग

हो, बरोबर तिळाचा स्क्रब म्हणून खूप चांगला फायदा होतो. तीळ रात्री दुधामध्ये भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमधून याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये हळद आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हा स्क्रब चेहरा आणि अंगाला लावा. या पेस्टने मसाज करा. या स्क्रबमुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होतो, त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसते. विशेष तीळ हे उष्ण असतात त्यामुळे ज्यांचं शरीर आधीच अधिक उष्ण असेल त्यांनी तिळाचा वापर कमी करावा.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या

Homemade Face Packs : चकाचक चेहरा हवा आहे? मग ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!

Beauty Benefits : कोरड्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा, वाचा फायदे!

Winter Skincare Tips : हिवाळ्यात मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!

(eating sesame seeds is extremely beneficial for health)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.