AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Milk Face Pack : चमकदार आणि ग्लोईंग त्वचेसाठी नारळाच्या दुधाचे ‘हे’ फेसपॅक वापरुन पाहा!

नारळ दूध हे आपल्या त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉश्चरायझर आहे. हे मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करते.

Coconut Milk Face Pack : चमकदार आणि ग्लोईंग त्वचेसाठी नारळाच्या दुधाचे 'हे' फेसपॅक वापरुन पाहा!
नारळाचे दूध
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 10:01 AM
Share

मुंबई : नारळाचे दूध आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या दुधात फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते. हे मृत त्वचा काढून टाकण्यासाठी कार्य करते. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे सी आणि ई त्वचेला पुनरुज्जीवन देण्यास मदत करतात. नारळ दूध हे आपल्या त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉश्चरायझर आहे. हे मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करते. आपण घरचे घरी नारळाच्या दूधाचे फेसपॅक तयार करू शकतो. (Face pack of Coconut Milk is beneficial for the skin)

गुलाब पाणी आणि नारळाच्या दुधाचा फेसपॅक – एका भांड्यात एक चमचा नारळाचे दूध घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला. कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण सर्व चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण त्वचेवर साधारण वीस मिनिटे तसेच ठेवा. हा पॅक लावल्याने चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. आपण दिवसातून दोनदा हा अ‍ॅन्टी मुरुम नारळ दुधाचा फेसपॅक लावू शकता.

मध, बदाम आणि नारळ दुधाचा फेसपॅक – 5 बदाम घ्या आणि त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा. दुसर्‍या दिवशी त्यांची बारीक करून पेस्ट तयार करा. एक चमचा बदाम पेस्ट घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे दूध आणि मध घाला. नारळाच्या दुधाचा हा फेसपॅक चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा आणि नंतर ते 10 मिनिटांसाठी त्वचेवर ठेवा. यानंतर साध्या पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा नारळाच्या या दुधाचा फेसपॅक वापरा.

ओट्स आणि नारळाच्या दुधाचा फेसपॅक – ओट्स बारीक करून त्याचे पावडर तयार करा. एका भांड्यात एक चमचा ओट्स पावडर घ्या आणि त्यामध्ये आवश्यक प्रमाणात नारळाचे दूध मिसळून पेस्ट तयार करा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने चेहरा आणि मान मालिश करा. 20 ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा. आपण हा एक्सफोलिएटिंग नारळ दुधाचा फेसपॅक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लागू करू शकता.

कोरड्या त्वचेसाठी दही आणि नारळ दुधाचा फेसपॅक – दोन चमचे नारळाचे दूध घ्या आणि त्यात एक चमचा ताजे दही घाला. नारळाच्या दुधाच्या या फेसपॅकसह आपल्या त्वचेची मालिश करा आणि 10-15 मिनिटे ठेवा. ते काढण्यासाठी सूती कपडा वापरा आणि मग साध्या पाण्याने चेहरा धुवा. नारळाच्या दुधाचा हा फेसपॅक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लागू शकतो.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Face pack of Coconut Milk is beneficial for the skin)

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....