Hair Care Tips : दोन तोंडी केसांची समस्या दूर करायची असेल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

ज्याप्रमाणे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण केस आपले सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. परंतु काहीवेळा केसांच्या मुळांच्या क्यूटिकलला इजा होते. ज्यामुळे केस तुटण्याची समस्या उद्भवते.

Hair Care Tips : दोन तोंडी केसांची समस्या दूर करायची असेल तर 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
केसांची काळजी
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:30 AM

मुंबई : ज्याप्रमाणे त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केसांची काळजी (Hair Care) घेणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण केस आपले सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. परंतु काहीवेळा केसांच्या मुळांच्या क्यूटिकलला इजा होते. ज्यामुळे केस तुटण्याची समस्या उद्भवते. अशा स्थितीत केसांच्या वाढीवर थेट परिणाम होतो, तसेच केस दोन तोंडी होतात.

केसांमध्ये पोषणाचा अभाव, कोरडेपणा, रासायनिक प्रक्रिया,उपकरणांचा वापर, प्रदूषण,  सूर्यप्रकाश आणि आनुवंशिकता इत्यादींमुळे दोन तोंडी केस होऊ शकतात. दोन तोंडी केसांना खालून थोडेसे ट्रिम करणे. तुमचे केस ट्रिम केल्याने चांगले होतात आणि त्यांची वाढही होते. हेच कारण आहे की बहुतेक सौंदर्य तज्ञ दर तीन महिन्यांनी केस ट्रिम करण्याचा सल्ला देतात.

तेल न लावल्यामुळे केसांना पोषण मिळत नाही आणि कोरडेपणा वाढतो. कोरडेपणामुळे केस फुटतात. केसांची ही समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा रात्रभर केसांना तेल लावावे. जर तुम्ही रात्रभर तेल लावू शकत नसाल तर काही तास तेल लावा. तेल लावताना दोन तोंडी केसांना तेल लावा.

शॅम्पूमुळे तुमच्या केसांची क्युटिकल्स उघडतात. त्यांना सील करण्यासाठी कंडिशनर आवश्यक आहे. त्यामुळे केसांमध्ये हायड्रेटिंग कंडिशनर वापरा. याशिवाय केस टॉवेलने रगडून कोरडे करू नका किंवा केस धुतल्यानंतर ड्रायरचा वापर करू नका. ओले केस बांधू नका आणि कधीही घट्ट पोनीटेल बनवू नका.

भरपूर पाणी आणि द्रव आहार घ्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते. वेळोवेळी केसांमध्ये दही, मध, अंडी यापासून बनवलेला होममेड हेअरमास्क लावा. हे केसांच्या दुरुस्तीसाठी काम करते. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले रेडिमेड हेअर मास्कही तुम्ही वापरू शकता. व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.