AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : मुरुमापासून मुक्त व्हा, चमकदार त्वचा मिळवा, या 4 टिप्स फाॅलो करा!

निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार हे खूप महत्वाचे आहे. आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि त्वचेवर परिणाम होतो. म्हणूनच आपण आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. मुरुमाच्या समस्येबद्दल सर्व वयोगटातील लोक चिंतित आहेत.

Skin Care : मुरुमापासून मुक्त व्हा, चमकदार त्वचा मिळवा, या 4 टिप्स फाॅलो करा!
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 11:00 AM
Share

मुंबई : निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार हे खूप महत्वाचे आहे. आपण जे काही खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि त्वचेवर परिणाम होतो. म्हणूनच आपण आपल्या आहारात पौष्टिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. मुरुमाच्या समस्येमुळे जवळपास सर्वचजण त्रस्त आहेत. चेहऱ्यावर मुरूम असण्याची बरीच कारणे असू शकतात.

आरोग्य आणि त्वचाशास्त्रज्ञांच्या मते, खराब जीवनशैली तसेच हार्मोनल समस्यांमुळे मुरुम होऊ शकतात. म्हणून, मुरुमासाठी थेट औषध घेणे हा योग्य मार्ग नाही. काहीही करण्यापूर्वी आपण नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करू शकता.

1. त्वचा हायड्रेटेड ठेवा

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळण्यासाठी पुरेसे पाणी प्या. शरीरासाठी तसेच त्वचेसाठी हायड्रेशन आवश्यक आहे. खरं तर, पाणी शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय, हे मुरुमापासून मुक्त होण्यास देखील मदत करते. तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

2. योग्य उत्पादने निवडा

बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. जर तुम्हाला मुरुमाची समस्या असेल तर उत्पादने निवडताना काळजी घ्या. योग्य उत्पादने लावल्याने पुरळ कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बॉडी लोशन, क्रीम लक्षात ठेवून लागू करा.

3. स्वच्छ त्वचा

त्वचेवर पुरळ येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत या समस्येपासून मुक्त होण्यासाठी स्वच्छता पाळा. मृत त्वचा काढण्यासाठी आठवड्यातून दोनदा त्वचा एक्सफोलिएट करा. याशिवाय, एक्सफोलिएशन त्वचेची घाण साफ करण्यास मदत करते.

4. संतुलित आहार

मुरुमापासून मुक्त होण्यासाठी संतुलित आहार घ्या. कारण आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि शरीरावर दिसून येतो. म्हणून, तुम्हाला जे शक्य असेल ते निरोगी आणि पौष्टिक गोष्टी खा. जंक फूड जास्त खाल्ल्याने मुरुमाची समस्या वाढते. निरोगी जीवनशैली केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these 4 tips to get glowing skin)

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं