AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘हे’ ग्रीन टी फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेची चमक परत मिळवा!

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला मुरुमाची समस्या देखील असेल. याशिवाय प्रदूषणाच्या संपर्कात राहणे, जास्त वेळ उन्हात राहणे आदी कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स होतात. या पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग पडतात. जे दिसायला खूपच कुरूप दिसतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्यावर होतो.

Skin Care : 'हे' ग्रीन टी फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेची चमक परत मिळवा!
ग्रीन टी
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला मुरुमाची समस्या देखील असेल. याशिवाय प्रदूषणाच्या संपर्कात राहणे, जास्त वेळ उन्हात राहणे आदी कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स होतात. या पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग पडतात. जे दिसायला खूपच कुरूप दिसतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या सौंदर्यावर होतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी त्वचेला वेळोवेळी डिटॉक्स करणे आवश्यक आहे.

ग्रीन टी त्वचेला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण इथे आपण ग्रीन टी पिण्याबद्दल नाही तर त्याच्या फेस पॅकबद्दल बोलत आहोत. ग्रीन टीमध्ये अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे केवळ मुरुम आणि डागांची समस्याच दूर करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते आणि वृद्धत्वाच्या प्रभावांना देखील प्रतिबंधित करते. ग्रीन टी फेस पॅक कसा वापरायचा ते जाणून घ्या.

ग्रीन टी फेसपॅक कसा बनवायचा

ग्रीन टीच्या दोन टी बॅग घ्या आणि एका भांड्यात ठेवा आणि त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

चेहऱ्यावर पॅक लावा

ग्रीन टी फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. हा पॅक डोळे आणि तोंड वगळता उर्वरित चेहऱ्यावर लावा. सुमारे 10 मिनिटे राहू द्या. यानंतर चेहरा कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

कोरड्या त्वचेची समस्या

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हा पॅक बनवताना फक्त एक ग्रीन टी बॅग वापरा. याशिवाय त्यात लिंबू घालू नका. फक्त दोन चमचे मध मिसळा. त्यानंतर पॅक वापरा. फक्त आठवड्यातून दोनदा लावल्याने तुम्हाला खूप फरक जाणवेल. जर त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही त्यात दोन चमचे दही मिक्स करू शकता.

ग्रीन टी फेसपॅक सामान्य त्वचेच्या लोकांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. परंतु सामान्य त्वचा असलेल्यांनी त्याचा पॅक थोडा वेगळा बनवा. यासाठी एक चमचा ग्रीन टी, दोन चिमूटभर हळद आणि एक चमचा बेसन मिसळून त्यात गुलाबपाणी मिसळा. हा पॅक सुमारे 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Green Tea Facepack is extremely beneficial for the skin)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?