Dandruff | हिवाळ्यात कोंडा देतोय त्रास? मग करा घरच्या घरी हे उपाय

Dandruff | हिवाळ्यात कोंडा देतोय त्रास? मग करा घरच्या घरी हे उपाय
Dandruff

हिवाळ्यातील हवा तुमच्या टाळूची त्वचा कोरडी करते. त्यामुळे या ऋतूमध्ये केसांची निगा राखणे कठीण होतं. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा (Dandruff) तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 13, 2021 | 11:31 AM

मुंबई : प्रत्येकाला वाटतं की आपले केस काळेभोर, रेशमी, मुलायम दाट लखलखीत असावेत. केस निरोगी असतील तर केसांची कोणतीही फॅशन आणि हेअरकट करता येतो. केसांमुळे आपण अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो. आज प्रत्येक जण केसांच्या समस्यांमुळे कंटाळून गेला आहे. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

केसात कोंडा का होतो?

हिवाळ्यातील हवा तुमच्या टाळूची त्वचा कोरडी करते. त्यामुळे या ऋतूमध्ये केसांची निगा राखणे कठीण होतं. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा (Dandruff) तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो.

चला पाहूयात ते उपाय

1. एक वाटी दह्यात 1 चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा त्रिफळा पावडर रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हा मास्क एक तास लावून ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. तुम्ही हा मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.

2. एक वाटीत खोबरेल तेल घेऊन ते 2 मिनिटे गरम करा. नंतर त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण रात्रभर किंवा आंघोळीच्या आधी 2 तास केसांवर लावा. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा करा.

3. एक कप अलोवेरा जेलमध्ये दोन चमचे एरंडेल तेल मिसळा. ते तुमच्या टाळूवर रात्रभर लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शाम्पूने धुवा. तुम्ही हे आठवड्यातून एकदा करा.

4. एक कप मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्याची पेस्ट बनवा आणि त्यात 2 चमचे कोरफड वेरा जेल घाला. ही पेस्ट तुमच्या टाळूवर 1 तास लावून ठेवा. केस पहिले पाण्याने धुवा आणि नंतर सौम्य शैम्पू वापर करा. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.

5. 2 ग्लास ताकात 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळा आणि रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी, या औषधी ताकाने आपले केस धुवा आणि नंतर सौम्य शैम्पू वापरा. तुम्ही उपाय आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

संबंधित बातम्या :

Skin Care Tips : चेहऱ्याची नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

Hair Care : प्रसूतीनंतर केस गळतीची समस्या आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें