AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय

हे उपाय अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपचार आहेत ज्यामुळे चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढून टाकू शकतात. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)

Skin Care Tips : चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई : चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस ही एक समस्या आहे, ज्यापासून बहुतेक स्त्रिया सुटका करु इच्छित असतात. जर आपल्याला प्रत्येक वेळी सलूनला भेट देणे शक्य नसेल तर आपण यासाठी काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. हे उपाय अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपचार आहेत ज्यामुळे चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढून टाकू शकतात. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)

साखर आणि लिंबाचा रस

यासाठी 8-9 चमचे पाण्यात दोन मोठे चमचे साखर आणि लिंबाचा रस मिसळावा लागेल. त्यात बुडबुडे येईपर्यंत हे मिश्रण गरम करा आणि नंतर ते थंड होऊ द्या. हे स्पॅचुलाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा आणि सुमारे 20-25 मिनिटे ठेवा. हे चेहऱ्यावर गोलाकार चोळून थंड पाण्याने धुवा.

हे कसे कार्य करते?

साखर एक नैसर्गिक एक्सफोलीएटिंग एजंट आहे आणि गरम साखर आपल्या केसांवर चिकटते. लिंबाचा रस त्वचेच्या केसांना नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तसेच त्वचेचा टोन हलका करण्यात मदत करते.

लिंबू आणि मध

यासाठी आपल्याला दोन चमचे साखर आणि लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळावे लागेल. मिश्रण सुमारे तीन मिनिटे गरम करावे. आवश्यक असल्यास मिश्रण पातळ करण्यासाठी पाणी घाला. पेस्ट थंड झाल्यावर प्रभावित भागावर कॉर्नस्टार्च लावा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने पेस्ट पसरवा. पुढे, एक व्हॅक्सिन पट्टी किंवा सूती कपडा वापरा आणि केसांच्या वाढीच्या उलट दिशेने ओढा. मध त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यात मदत करते.

ओट्स आणि केळी

ही पद्धत अगदी सोपी आहे. दोन चमचे ओट्सचे पीठ योग्य केळीमध्ये मिसळा आणि ही पेस्ट प्रभावित भागावर लावा. 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि थंड पाण्याने धुवा. ओट्स एक छान हायड्रेटिंग स्क्रब बनवते आणि अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असते. हे आपल्या त्वचेवरील लालसरपणा दूर करण्यास मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याशिवाय ही पेस्ट चमकदार त्वचा तयार करण्यात मदत करते.

बटाटे आणि ओट्स

पाच चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध, लिंबाचा रस मिसळा. दरम्यान, ओट्स (रात्रभर भिजवलेले) बारीक वाटून त्याची पेस्ट करा. हे मिश्रण प्रभावित भागावर सुमारे 20 मिनिटांसाठी लावा. जेव्हा ते पूर्णपणे कोरडे होईल तेव्हा ते धुवा. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)

इतर बातम्या

प्रत्येकाला चेकद्वारे पेमेंट देता? मग जाणून घ्या हा नियम, अन्यथा द्यावा लागेल अतिरिक्त चार्ज

भिवंडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी, घरफोडी, दरोड्याच्या प्रकरणातील 9 आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.