AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात सकाळी चेहऱ्यावर लावा ‘या’ गोष्टी, दिवसभर तुमची त्वचा राहील फ्रेश

ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात, तीव्र सूर्यप्रकाश, घाम आणि धूळ यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत, तुम्ही सकाळी तुमच्या चेहऱ्यावर या नैसर्गिक गोष्टी लावू शकता, यामुळे त्वचा चमकदार आणि थंड राहण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात की उन्हाळ्यात कोणत्या नैसर्गिक गोष्टी चेहऱ्यावर लावू शकतात.

उन्हाळ्यात सकाळी चेहऱ्यावर लावा 'या' गोष्टी, दिवसभर तुमची त्वचा राहील फ्रेश
glowing skinImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 01, 2025 | 11:33 AM
Share

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण वाढत्या तापमानामुळे तीव्र सूर्यप्रकाश, घाम आणि दमट उष्णतेमुळे, त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यामुळे जळजळ आणि लालसरपणासारख्या समस्या सतावत असतात. याशिवाय, चेहऱ्यावर उष्णता आणि घामामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. यासाठी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या पाळणे खूप महत्वाचे आहे.

अति उष्णतेमध्ये आपण घरी असलेल्या काही गोष्टी चेहऱ्यावर लावू शकता. जेणेकरून चेहऱ्याला थंडावा मिळेल आणि तुमची त्वचा मऊ राहील. सकाळी तुमच्या त्वचेवर लावता येणाऱ्या नैसर्गिक गोष्टींबद्दल आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.

गुलाब पाणी

तुम्हाला उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसण्यासाठी गुलाबपाण्याचा टोनर म्हणून वापर करू शकता. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर गुलाबजल लावा. हे त्वचेला हायड्रेट करण्यास आणि छिद्रे घट्ट करण्यास मदत करते. गुलाबपाण्याला नैसर्गिक टोनर असेही म्हणता येईल, जे त्वचेला ताजेतवाने करते आणि उष्णतेमुळे त्वचेची जळजळ कमी करू शकते.

कोरफड जेल

सकाळी चेहरा धुतल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड जेल लावू शकता. त्वचेला थंडावा देण्यासोबतच ते मऊ आणि चमकदार ठेवण्यास देखील मदत करते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर कोरफड जेल तुमच्यासाठी हलके मॉइश्चरायझर म्हणून काम करेल आणि तुमची त्वचा चिकट वाटणार नाही.

काकडीचा रस

तुम्ही काकडीचा रस नैसर्गिक टोनर म्हणून त्वचेवर देखील वापरू शकता. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि थंडावा मिळतो. यासोबतच, ते चेहऱ्याचा रंग वाढवण्यास देखील मदत करू शकते. त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेवर येणारी सूज, लालसरपणा आणि मुरुम कमी करण्यास मदत करू शकते.

कच्चे दूध

कच्च्या दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे तुमच्या त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. तसेच, ते त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करते.

याशिवाय, तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर आणि एसपीएफ क्रिम नक्कीच लावा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी, जेल किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आणि एसपीएफ परिपूर्ण असेल. याशिवाय आठवड्यातून दोनदा स्क्रब करा जेणेकरून त्वचेवर साचलेली धूळ आणि घाण निघून जाईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...