Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!

खराब जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या त्वचेवरही होतो. यासोबत चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. यासाठी तुम्ही विविध प्रकारची उत्पादने वापरता. परंतु त्यांच्या दुष्परिणामांमुळे चेहरा अधिकच खराब होतो. जर खरोखरच तुम्हा सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असेल तर तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Skin Care : त्वचेवर नैसर्गिक चमक हवी आहे? मग आजच आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा!
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी या टिप्स फाॅलो कराImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 10:59 AM

मुंबई : खराब जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या त्वचेवरही होतो. यासोबत चेहऱ्याची नैसर्गिक चमक नाहीशी होते. यासाठी तुम्ही विविध प्रकारची उत्पादने वापरता. परंतु त्यांच्या दुष्परिणामांमुळे चेहरा अधिकच खराब होतो. जर खरोखरच तुम्हा सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing skin) हवी असेल तर तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे. सकस आहार घेतल्याने शरीराचे पोषण होते आणि तुमची त्वचा (Skin) देखील सुधारते. आज आम्ही तुम्हाला काही महत्वाचा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि पिंपल्सची समस्या कायमची दूर होईल.

टोमॅटो

टोमॅटोशिवाय कोणत्याच भाजीला चव लागत नाही. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. ते तुमची त्वचा निरोगी बनवते आणि वयाच्या प्रभावापासून संरक्षण करते. टोमॅटोचा रसही चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर ग्लोही येतो. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करा. विशेष म्हणजे टोमॅटो आपण कच्चे देखील खाऊ शकतो.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी 2, बी 3 आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यायले तर तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिकरित्या चमकते. नारळपाणी प्यायल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की, नारळाचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आंबा

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये फळांचा राजा बाजारामध्ये दाखल होतो. आंबा हे असे फळ आहे, जे जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडते. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे तुमच्या शरीरातील कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे काम करते आणि त्वचा निरोगी ठेवते. तजेलदार त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये आंब्याचा समावेश करा.

कलिंगड

उन्हाळ्यात कलिंगड सहज बाजारामध्ये मिळते. या ऋतूमध्ये अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत कलिंगडचे सेवन करायला हवे. जर आपल्याकडे वेळ जास्त असेल तर आपण कलिंगडचा ज्यूस देखील आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. कलिंगड तुमच्या शरीराला ऊर्जा आणि पोषण देते आणि तुमची त्वचा हायड्रेट करते.

काकडी

बाराही महिने काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हंगाम कोणतेही असो बाजारामध्ये काकडी सहज मिळते. काकडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्वचेसाठीही काकडी खूप जास्त फायदेशी आहे. काकडीमध्ये अँटीएजिंग घटक असतात. त्वचेवर काकडीचा रस लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या :

Health : काकडी आणि कोथिंबीरच्या स्मूदीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर!

India Corona Cases Update : आकडा वाढतोय, गेल्या चोवीस तासात देशभरात हजाराच्या घरात नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.