AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्वंद आणि गुलाब पाकळ्याचा ‘हा’ खास फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज चेहऱ्याला जास्वंद आणि गुलाब पाकळ्याचा फेसपॅक लावला पाहिजे. हा फेसपॅक लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

जास्वंद आणि गुलाब पाकळ्याचा 'हा' खास फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 15, 2021 | 6:59 AM
Share

मुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज चेहऱ्याला जास्वंद आणि गुलाब पाकळ्याचा फेसपॅक लावला पाहिजे. हा फेसपॅक लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी अगदी सोप्पा आहे. आणि जास्त काही वेळ ही लागत नाही. हा फेसपॅक महागड्या उत्पादकांना देखील मागे पाडतो. (jaaswand and rose petals This special face pack is beneficial for the skin)

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला सात ते आठ जास्वंदाची फुले, पाच ते सहा गुलाब पाकळया आणि बेसन पीठ लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट साधारण तीस मिनिटांसाठी आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक तयार करण्यासाठी अगदी सोपा आहे.

आपण दररोज देखील हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे नारळ तेल, 5 चमचे गुलाब पाकळ्यांची पावडर, 1 चमचे लव्हेंडर तेल आणि 1 चमचे दही लागेल. हे सर्व घटक मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. डोळे सोडून बाकी सर्व चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. सुमारे 15-20 मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर तसाच सोडा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

आपण गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि दूधाचा फेसपॅक तयार करू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे गुलाब पाकळ्याची पावडर, अर्धा चमचे पाणी, 2 चमचे दूध आणि 2 चमचे एरंडेल तेल आवश्यक आहे. यासाठी प्रथम एक वाटी घ्या आणि त्यात सर्व साहित्य एक-एक करून टाका. या सर्व घटकांचे मिश्रण तयार करा. याची पेस्ट तयार करून संपूर्ण चेहऱ्याला लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(jaaswand and rose petals This special face pack is beneficial for the skin)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला