AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : सुंदर चेहरा मिळवण्यासाठी मसूर डाळ आणि दह्याचा ‘हा’ फेसपॅक वापरा!

सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही.

Skin Care : सुंदर चेहरा मिळवण्यासाठी मसूर डाळ आणि दह्याचा 'हा' फेसपॅक वापरा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 2:53 PM
Share

मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जोपर्यंत आपण त्वचेची विशेष काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा सुंदर होत नाही. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दरवेळी बाजारातून महागड्या क्रिम आणण्याची काही गरज नाहीतर आपण घरगुती उपाय करूनही सुंदर त्वचा मिळू शकतो. यासाठी आपल्याला काही घरगुती फेसपॅक वापरावे लागतील. (Masoor dal and curd face pack is beneficial for the skin)

मसूर डाळ आणि दह्याचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी रात्री मसूर डाळ पाण्यात भिजू घालावी लागेल. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि या पेस्टमध्ये दही आणि लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. त्यानंतर ही पेस्ट साधारण वीस मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून दोन वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

डाळीची पूड आणि दुध एकत्र करून त्यांची पेस्ट बनवा. हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. जलद उपायासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक वापरा. जर, तुमची त्वचा कोरडी असेल, तर मसूर डाळीची पूड, गुलाब पाणी आणि दूध रात्रभर भिजवून ठेवून, सकाळी बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट जवळपास 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा.

हा फेस पॅक वापरल्याने तुमची त्वचा चमकदार बनेल. दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Masoor dal and curd face pack is beneficial for the skin)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.