
तुम्हीही चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पुटकुळ्यांमुळे त्रस्त आहात आणि महागडे ब्यूटी प्रोडक्ट्स वापरून थकला आहात तर आता चिंता करायची गरज नाही. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने एक असं औषध तयार केलंय जे अवघ्या सात दिवसात चेहऱ्यावरील पुटकुळ्या गायब करतं. हे औषध केवळ परिणामकारकच नाही तर त्याने कोणताही साईड इफेक्ट्स होत नसल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे. चेहऱ्यावरील मुरुम वगैरे मुळापासून हे औषध काढून टाकतं, असा दावाही करण्यात आला आहे.
पतंजलीचं हे औषध मुख्यत्वे एक आयुर्वेदिक स्किन केअर प्रोडक्ट आहे. ‘दिव्य कांति लेप’ आणि ‘नीम घन वटी’ असं या औषधांची नावे आहेत. ‘दिव्य कांति लेप’ हे एक हर्बल पेस्ट आहे. ते चेहऱ्याला लावले जाते. तर ‘नीम घन वटी’ ही एक गोळी असून ती खायची आहे. या दोन्ही औषधांमुळे त्वचा आतून आणि बाहेरून स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे पुटकुळ्यांची समस्या कमी होते. यात नैसर्गिक आणि आयुर्वेदिक जडी बुटींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्किन आतून साफ करून पुटकुळ्या मुळापासून निघून जातात.
अलीकडेच पतंजली आयुर्वेद संस्थेने केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी ही औषध सात दिवस नियमितपणे घेतली, त्यांचं चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांचं प्रमाण जवळजवळ पूर्णपणे कमी झालं. विशेष म्हणजे, या कालावधीत कोणत्याही रुग्णाला कोणतेही साइड इफेक्ट्स जाणवले नाहीत. चेहऱ्यावरील डाग-धब्बे कमी झाले आणि त्वचा पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ व तेजस्वी दिसू लागली. चला तर पाहूया, या औषधात कोणकोणत्या आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
कडुनिंब : त्वचा स्वच्छ करते आणि जीवाणूंना नष्ट करते.
गिलोय: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
त्रिफळा : शरीर डिटॉक्स करण्यात मदत करते आणि रक्त शुद्ध करते.
मंजिष्ठा : त्वचेचा नैसर्गिक तेज वाढवते आणि डाग-धब्बे कमी करते.
हळद: अँटी-बॅक्टेरियल असून सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात.
या गोळ्या दिवसातून दोन वेळा, जेवणानंतर पाण्यासोबत घ्याव्यात. त्याचबरोबर त्वचेची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल तर चेहरा स्वच्छ करूनच औषध घ्या. आहारही संतुलित असावा. अधिक तळलेले, मसालेदार व तेलकट अन्न टाळा.
हे औषध पूर्णपणे आयुर्वेदीक आहे, त्यामुळे 16 वर्षांवरील कोणीही याचा वापर करू शकतो. परंतु जर कोणाला पूर्वीपासून त्वचेची अॅलर्जी, हार्मोनल समस्या किंवा कोणतीही गंभीर व्याधी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.