Winter Problems : कोरड्या त्वचेची समस्या दूर करून तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती फायदेशीर!

थंड हवेचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी होते. अशा स्थितीत डिहायड्रेशन होते आणि आपली त्वचा अधिक कोरडी होते.

Winter Problems : कोरड्या त्वचेची समस्या दूर करून तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी 'हे' घरगुती फायदेशीर!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 10:37 AM

मुंबई : थंड हवेचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी होते. अशा स्थितीत डिहायड्रेशन होते आणि आपली त्वचा अधिक कोरडी होते.

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बाजारामध्ये अनेक उत्पादने मिळतात. मात्र, या हंगामात मुळातच त्वचा इतकी जास्त कोरडी पडते की, त्या उत्पादनांचा जास्त काही परिणाम आपल्या त्वचेवर जाणवत नाही आणि आपली त्वचा कोरडी पडते. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

संत्र्याची साल

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. हे तुमच्या त्वचेला टवटवीत करण्याचे काम करते. पण जर तुम्ही संत्री खात नसाल तर तुम्ही त्याची साल वापरू शकता. यासाठी संत्रीची साल सुकवून पावडर तयार करा. त्यानंतर एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या, त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बेसन पीठ मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा. या खास पॅकमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

हळद आणि बेसन

कोरडी त्वचा दूर करण्यासाठी हळद आणि बेसनाचा वापर करा. दोन चमचे बेसन, एक चमचे हळद पावडरमध्ये मिक्स करा. शक्य असेल तर त्यामध्ये कच्चे दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

मसूर आणि गुलाब पाणी 

त्वचेचा टोन सुधारण्यास आणि कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मसूर खूप फायदेशीर आहे. मसूरची डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर बारीक पेस्ट तयार करून गुलाब पाणी आणि एक चमचा दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे कोरड्या त्वचेचा समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.