Skin Care : ‘हे’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारची उत्पादने वापरतो. मात्र, तरीही सुंदर त्वचा मिळत नाही. कारण दरवेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त बाजारातील महागडे उत्पादने वापरण्याची काही गरज नसते. तर आपण काही घरगुती उपाय करूनही आपली त्वचा सुंदर बनू शकतो.

Skin Care : 'हे' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 8:07 AM

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारची उत्पादने वापरतो. मात्र, तरीही सुंदर त्वचा मिळत नाही. कारण दरवेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त बाजारातील महागडे उत्पादने वापरण्याची काही गरज नसते. तर आपण काही घरगुती उपाय करूनही आपली त्वचा सुंदर बनू शकतो. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही खर्च देखील लागत नाही. (These 3 facepacks are extremely beneficial for the skin)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, खोबरेल आणि बेसनचा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल. यासाठी आपल्याला चार चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर, दोन चमचे खोबरेल तेल आणि दोन चमचे बेसन पीठ लागणार आहे.

हा खास पॅक तयार करण्यासाठी आपण सर्वात अगोदर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर त्वचेला लावून आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो.

गुलाब पाण्याच्या मदतीने आपण तजेलदार आणि सुंदर त्वचा मिळू शकतो. सुंदर त्वचेसाठी आपण अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि गुलाब पाणी आपल्या त्वचेसा लावले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. गुलाब पाकळ्या, मुलतानी माती आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. मात्र, हा फेसपॅक करताना नेहमीच गुलाबाच्या पाकळ्या या ताज्या असाव्यात.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी साधारण मुठभर गुलाब पाकळ्या, दोन चमचे मुलतानी माती आणि दोन चमके अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्याला लागणार आहे. सर्वात अगोदर गुलाब पाकळ्यांची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून हे एकजीव करा. त्यानंतर हा पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 3 facepacks are extremely beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.