AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dark Circle Home Remedy : डार्क सर्कल दूर करण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!

दिवसा आणि रात्री नीट झोप न घेतल्याने अनेकदा काळी वर्तुळे आणि डोळे फुगलेले दिसतात. याशिवाय ही समस्या तणाव, थकवा आणि डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते. अनेक लोक काळी वर्तुळे लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.

Dark Circle Home Remedy : डार्क सर्कल दूर करण्यासाठी 'हे' 5 घरगुती उपाय फायदेशीर!
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : दिवसा आणि रात्री नीट झोप न घेतल्याने अनेकदा काळी वर्तुळे आणि डोळे फुगलेले दिसतात. याशिवाय ही समस्या तणाव, थकवा आणि डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते. अनेक लोक काळी वर्तुळे लपवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही यासाठी घरगुती उपाय देखील करून पाहू शकता.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती उपाय

गुलाब पाणी आणि काकडी

काकडी आणि गुलाब पाण्याने काळी वर्तुळे आणि फुगलेल्या डोळ्यांपासून सुटका मिळवू शकते. काकडी किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.

कोरफड आणि गाजर मास्क

कोरफड सुरकुत्या, बारीक रेषा आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते. गाजर डोळ्यांखालील काळी वर्तुळे हलकी करतात. गाजर किसून त्याचा रस पिळून घ्या. एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करा आणि कापसाचा गोळा वापरून ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. 15 मिनिटांनंतर ते धुवा.

हळद आणि लिंबू मास्क

लिंबू आणि हळद एकत्र वापरता येते. त्यात व्हिटॅमिन सी असते. ते वृद्धत्वाच्या लक्षणांशी लढतात. ज्यामुळे त्वचेला चमक येते. हळद डोळ्यांखालील भागाचे पोषण करते. हा आय मास्क बनवण्यासाठी 2 चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा हळद पावडर घ्या. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि डोळ्यांखाली लावा. सुमारे 30 मिनिटे ते राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा.

बटाटा आणि पुदीना मास्क

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे फ्री रॅडिकल्स आणि कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे. यासाठी एक सोललेला बटाटा आणि पुदिन्याची पाने एकत्र मिसळा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि कापसाच्या मदतीने ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. साधारण वीस मिनिटे हे राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

कॉफी मास्क

कॉफी तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कॅफिन त्वचा स्वच्छ करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. हा कॉफी मास्क बनवण्यासाठी प्रथम एक चमचा कॉफी पावडर एक चमचा मध आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळा. त्यात कापसाचे पॅड बुडवून डोळ्यांना लावा. साधारण दहा मिनिटे हे डोळ्यांसाठी राहूद्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 5 home remedies to get rid of dark circles are beneficial)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.