AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care: पिंपल्सची समस्या कायमची दूर करायची आहे? मग हे घरगुती फेस सीरम नक्की वापरा!

चेहऱ्यावर मुरूम (Pimples) येणे ही एक सामान्य घटना आहे. मात्र, मुरूम येण्याचे प्रमाण अधिक झाले आणि योग्य वेळी योग्य उपचार (Treatment) घेतले गेले नाही तर चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग पडतात. विशेष म्हणजे हे पिंपल्सचे डाग काढणे अत्यंत अवघड काम आहे.

Skin care: पिंपल्सची समस्या कायमची दूर करायची आहे? मग हे घरगुती फेस सीरम नक्की वापरा!
पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 11:23 AM
Share

मुंबई : चेहऱ्यावर मुरूम (Pimples) येणे ही एक सामान्य घटना आहे. मात्र, मुरूम येण्याचे प्रमाण अधिक झाले आणि योग्य वेळी योग्य उपचार (Treatment) घेतले गेले नाही तर चेहऱ्यावर पिंपल्सचे डाग पडतात. विशेष म्हणजे हे पिंपल्सचे डाग काढणे अत्यंत अवघड काम आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक (Natural) गोष्टींचा वापर करावा. हे चांगले परिणाम देतात. यामुळे मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजेत.

गाजराचा रस

गाजरात असे अनेक पोषक घटक असतात, जे त्वचेला दुरुस्त करतात आणि रंग सुधारतात. हे सीरम लावण्यापूर्वी तुम्हाला त्वचेच्या प्रकाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. ते बनवण्यासाठी तीन चमचे गाजराच्या रसात अर्गन ऑइल आणि रोझ ऑइल मिसळा. नीट मिक्स करून बाटलीत भरून ठेवा. हे सिरम रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी चेहरा धुल्यानंतर चेहऱ्यावर लावा.

कडुलिंबाच्या झाडाची पाने

कडुलिंबात असलेले औषधी गुणधर्म मुरुम दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. कडुलिंबाच्या पानांपासून सीरम तयार करण्यासाठी, 4 ते 5 कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात एक चमचा कोरफड जेल आणि टी ट्री ऑइल मिसळा. त्यात गुलाबजलही टाका. नीट मिक्स केल्यानंतर हे फेस सीरम एका बाटलीत ठेवा आणि आठवड्यातून तीनदा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा.

जोजोबा ऑइल

हे फेस सीरम बनवण्यासाठी जोजोबा ऑइल व्यतिरिक्त तुम्हाला टी ट्री ऑइल आणि लेमन ग्रास ऑइल देखील लागेल. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. यासाठी हे सर्व तेल एका भांड्यात मिक्स करून बाटलीत भरून ठेवा. हे सिरम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. मुरुम कमी करण्यासोबतच त्वचा चमकदारही होईल.

संबंधित बातम्या : 

Protein Diet : ‘या’ 7 भाज्या आहेत प्रोटीनचा पॉवर हाऊस, आहारात नक्कीच समावेश करा आणि निरोगी राहा!

Homemade Scrubs : सन टॅनची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली