Skin care Tips: तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, वाचा!

फेस स्कल्प्टिंगला गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रियता मिळाली आहे. परंतु अजूनही बर्‍याच लोकांना याबद्दल माहिती नाही. फेस स्कल्प्टिंग एक नैसर्गिक उपचार आहे. ज्यामुळे आपला चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर होतो. फेस स्कल्प्टिंग म्हणजे नेमके काय आणि त्याचा वापर कसा केला जातो.

Skin care Tips: तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा, वाचा!
सुंदर त्वचा

मुंबई : फेस स्कल्प्टिंगला गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रियता मिळाली आहे. परंतु अजूनही बर्‍याच लोकांना याबद्दल माहिती नाही. फेस स्कल्प्टिंग एक नैसर्गिक उपचार आहे. ज्यामुळे आपला चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर होतो. फेस स्कल्प्टिंग म्हणजे नेमके काय आणि त्याचा वापर कसा केला जातो. (This home remedy is beneficial for getting radiant skin)

हे आज आपण बघणार आहोत. फेस स्कल्प्टिंगचा वापर बरेचजण चमकदार त्वचा मिळवण्यासाठी देखील करतात. यामुळे रक्त परिसंचरण वाढवते आणि चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे आपला चेहरा चमकदार बनतो.

फेस रोलर्स

फेस रोलर्स हे अतिशय लोकप्रिय आहे. जवळपास सर्वांकडेच फेस रोलर्स असते. ते रक्त परिसंचरण वाढविण्यास, जळजळ कमी करण्यास आणि आपली त्वचा घट्ट करण्यास मदत करतात. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपण काहीवेळ फेस रोलर्स केल्याने आपली त्वचा तजेलदार होण्यास देखील मदत होते.

आईस ग्लोब्स

चेहऱ्यावर नेहमी आईस ग्लोब्स लागले पाहिजेत. हे स्नायू, लालसरपणा आणि मुरूम कमी करण्यास मदत करते. हे त्वचा घट्ट करते आणि मोठ्या उघड्या छिद्रांना कमी करते. त्वचा घट्ट करणे म्हणजे सुरकुत्या आणि बारीक रेषा यांची समस्या दूर करते. ते आपली त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करते.

गुआ शा

हे एक स्किनकेअर टूल आहे. हे आपल्या त्वचेला मागे ढकलण्यासाठी आणि त्वचा घट्ट करण्यासाठी काम करते. गुआ शा रक्त परिसंचरण सुधारण्यास देखील मदत करते. नियमित मालिश केल्याने बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात. यामुळे आपल्या त्वचेसाठी गुआ शा फायदेशीर आहे.

चेहऱ्याची मालिश

मालिश करणे चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुधारण्यासाठी मालिश फायदेशीर आहे. मालिश केल्याने तुमची त्वचा चमकदार होते आणि बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात. विशेष म्हणजे मालिश केल्याने चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This home remedy is beneficial for getting radiant skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI