Homemade Face Packs: चमकदार त्वचेसाठी ‘हे’ नैसर्गिक फेसपॅक ठरतील फायदेशीर

Homemade Face Packs: चमकदार त्वचेसाठी ‘हे’ नैसर्गिक फेसपॅक ठरतील फायदेशीर
natural face pack
Image Credit source: file photo

स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या घटकांच्या माध्यमातून तुम्ही सहज हा नैसर्गिक फेसपॅक (Homemade Face Packs) तयार करुन आपल्या संवेदनशिल त्वचेला अधिक चमकदार बनवू शकतात. शिवाय बाहेरील कृत्रिम प्रोडक्टच्या तुलनेत यातून कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नसतो. त्यामुळे हा फेसपॅक वापरण्यास अत्यंत सुरक्षित आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Apr 01, 2022 | 3:14 PM

आजकाल वाढते प्रदूषण, धावपळीचे जीवन, चुकीच्या सवयी, सकस आहाराचा अभाव आदींचा परिणाम शरीरासह आपल्या त्वचेवरदेखील सहज दिसून येत असतो. नितळ व चमकदार त्वचा कोणाला नकोय? सर्वच जणांना आपला चेहरा नैसर्गिकरित्या ‘ग्लो’ (glowing skin) व्हावा असे वाटत असतेच. यासाठी अनेकदा बाहेरील कृत्रिम प्रोडक्टवर प्रचंड खर्च केला जात असतो. परंतु त्यातूनही कृत्रिम प्रोडक्टमुळे त्वचेवर दुष्परिणामांचा (Side effects) धोका असतोच. प्रत्येकाच्या त्वचेचे गुणधर्म वेगवेगळे असल्याने साहजिकच बाहेरील रासायनिक घटकांमुळे त्वचेवर पुरळ, लाल चट्टे, त्वचेची आग होणे आदी दुष्परिणाम दिसून येतात. परंतु तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातीलच काही घटक वापरुन घरगुती पध्दतीने नैसर्गिक फेसपॅक (face pack) तयार करु शकतात.

दही आणि ओट्स

या फेसपॅकसाठी तुम्हाला तीन लहान चमचे दही व दोन मोठे चमके ओटमीलची आवश्‍यकता असेल. ओट्‌सला बारीक करुन दह्यासोबत मिळून घ्या. या मिश्रणाला चेहर्यावर लावा व साधारणत: 20 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धूवावे. आठवड्यातून दोनदा या पध्दतीने हा फेसपॅक लावावा.

हळद, लिंबूचा रस आणि दूध

यासाठी एक मोठा चमचा लिंबूचा रस, तीन मोठे चमचे दूध व चिमुटभर हळद लागेल. एका भाड्यात हे सर्व मिश्रण एकत्र करा व कापसाने आपल्या चेहर्यावर हा फेसपॅक लावावा. त्यानंतर हे मिश्रण कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने धुवावे. साधारणत: आठवड्यातून दोन वेळा याचा वापर करु शकतो.

अंडी आणि बदाम

यासाठी पाच भिजवलेले बदाम कुटून घ्यावेत. त्यानंतर एक अंड चांगल फेटून हे दोन्ही घटकांचे एकत्र मिश्रण करावे. त्यानंतर चेहरा व गळ्यावर हे मिश्रण लावून साधारणत: 20 मिनिटांनी साध्या पाण्याने धूवावे, आठवड्यातून तीन वेळा याचा प्रयोग करण्यास हरकत नाही.

गाजर आणि मध

या फेसपॅकसाठी दोन उकळून बारीक केलेले गाजर व एक मोठ्या चमचा मधाची गरज आहे. हे मिश्रण एकत्र करुन चेहरा व गळ्यावर साधारणत: 20 मिनिटे लावावे, नंतर साध्या पाण्याने धुवावे. आठवड्यातून 3 वेळा याचा उपयोग केला जाउ शकतो.

हेही वाचा:

पोटाच्या विकारांपासून राहा दूर… आहारात ‘या’ सुपरफूडचा समावेश करा

Skin Care : काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें