AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोमॅटो आणि संत्र्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या चुटकीत दूर करा !

आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते.

टोमॅटो आणि संत्र्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या चुटकीत दूर करा !
सुंदर त्वचा
| Updated on: Jun 21, 2021 | 6:01 PM
Share

मुंबई : आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे आपली त्वचा अधिक चांगली होण्यास मदत होते. (Tomato and orange face pack is beneficial for the skin)

टोमॅटो आणि संत्रीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपण एक टोमॅटो आणि संत्री घ्या. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि संत्रीची चांगली पेस्ट तयार करा. त्या पेस्टमध्ये गुलाब पाणी आणि हळद मिक्स करा. ही पेस्ट दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. त्यानंतर साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोनदा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि पोषक तत्वे असतात. ते मुरुम आणि स्पॉट्सपासून मुक्त होण्यास मदत करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे पोषण तत्वांची कमतरता पूर्ण करते. टोमॅटोचे फेसपॅकही खूप फायदेशीर आहेत. टोमॅटो गडद डाग कमी करण्यास मदत करते. याचा उपयोग सनबर्नसाठीही केला जातो. हा पॅक करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटोचा पेस्ट आणि एक चमचा मध एकत्र करावे लागेल. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ सोडा. ते कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा हि प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Tomato and orange face pack is beneficial for the skin)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल