AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Remedies : मऊ आणि चमकदार केसांसाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा!

आपले केस निरोगी आणि चमकदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधीकधी केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे एक कारण रासायनिक उत्पादने आणि हीटिंग टूल्सचा वापर देखील असू शकते. या सर्वांमुळे केसांना निरोगी ठेवणे कठिण होऊन जाते.

Hair Care Remedies : मऊ आणि चमकदार केसांसाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा!
केस
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 07, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : आपले केस निरोगी आणि चमकदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधीकधी केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे एक कारण रासायनिक उत्पादने आणि हीटिंग टूल्सचा वापर देखील असू शकते. या सर्वांमुळे केसांना निरोगी ठेवणे कठिण होऊन जाते. निरोगी केसांसाठी तुम्ही नैसर्गिक पद्धती वापरून पाहू शकता. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते खोलवर पोषण करतात आणि टाळू स्वच्छ करतात.

नारळाचे तेल

नारळाचे तेल तुमचे केस चमकदार आणि मऊ बनवू शकते. त्यात जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड असतात. यासाठी एका वाडग्यात तीन ते चार चमचे नारळाचे तेल टाका आणि काही सेकंद गरम करा. या गरम तेलाने तुमच्या टाळूची 15 मिनिटांसाठी मालिश करा. आता आपले केस शॉवर कॅपने 20-25 मिनिटे झाकून ठेवा. सौम्य शैम्पूने ते धुवा.

कोरफड मास्क

कोरफड केस मजबूत करते आणि केस वाढण्यास मदत करते. हे टाळूची खाज शांत करण्यास मदत करते. कोरफडमध्ये एन्झाईम असतात जे तुमच्या टाळूच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करते. कोरफड हेअरमास्क तयार करण्यासाठी दोन चमचे कोरफड घ्या आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या केसांना दहा मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

दही आणि केळी हेअर मास्क

केळी आणि दही हे दोन लोकप्रिय पदार्थ आहेत. जे घरगुती पॅकमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आपण ते केस आणि त्वचेसाठी वापरू शकता. दहीमध्ये असलेले लैक्टिक अॅसिड केसांना हायड्रेट करते, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि केसांच्या रोम वाढण्यास मदत करते. केस मऊ करण्यासाठी एका वाडग्यात 2 चमचे साधे दही, 1 मॅश केलेली केळी मिक्स करा. हा पॅक वीस मिनिटे आपल्या केसांना लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Try this home remedy for shiny hair)

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....